ब्रिजबान जैसवाल, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 27 डिसेंबर 2023 : अंगावर शहारे आणणारी बातमी… मुंबईत अत्यंत दुदैवी घटना घडली आहे. मुंबईतील भाऊचा धक्का इथं मच्छीमार नौकेत गुदमरून दोघांचा मृत्यू झाला आहे. याच अपघातात गुदमरलेल्या एकाची प्रकृती गंभीर आहे. तर तिघे जण स्थिर आहेत. मृत आणि बेशुद्ध पडलेले दोघेही मूळचे आंधप्रदेशमधील आहेत. भाऊचा धक्का इथं मच्छी नौकेतून काढण्याचं काम हे दोघे करत होते. पण दुदैवाने या दोघांचा आज पहाटेच्या सुमारास मच्छिमार नौकेत या दोघांचा मृत्यू झाला आहे.
नौकांच्या दुर्घटनांच्या अनेक घटना समोर येतात. या घटनांचे व्हीडिओदेखील समोर येतात. अशातच आता मच्छि नौकेत उतरला असता तरूण बेशुद्ध येऊन पडले. या तरूणांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्यूमुखी पडलेले तरूण परराज्यातील होते. आंध्रप्रदेशमधील होते. या दोघांचाही मृत्यू झाला आहे. तर या घटनेत गंभीर असणाऱ्या तरूणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अंजनीपुत्र नौका मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास किरण भाई तांडेल यांनी न्यू फिश जेटी इथं आणली होती. त्यानंतर सकाळी नौकेतील तीन खणातली मच्छी विकण्यासाठी काढण्यात आली. दरम्यान, सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक कामगार इतर खणांमधील मासे काढण्यासाठी नौकेत उतरला. मात्र त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि तो बेशुद्ध पडला. त्यामुळे अन्य दोघे आत उतरले आणि त्यांनी त्या कामगाराला बाहेर काढलं.
अंजनीपुत्र नौकेत जेव्हा अन्य कर्मचारी उतरले. तेव्हा ते शोध घेत असताना आतमध्ये उतरलेले बी. श्रीनिवास यादव (वय- 35) आणि नौकेचा मालक नागा डॉन संजय (वय-27) हे दोघेही बेशुद्ध होऊन पडले होते. त्यानंतर बोटीवरील अन्य तिघेही बेशुद्ध पडले. त्या सर्वांना लगेच जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी बी श्रीनिवास आणि नागा डॉन या दोघांना तपासून मृत घोषित केलं. सुरेश मेकला (वय-28) याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे , उर्वरित तिघांची प्रकृती स्थिर आहे.