Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील ‘या’ पाच भागात 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या विभागात काय असणार स्थिती?

मुंबई महापालिकेने २४०० मिलीमीटर व्यासाच्या नवीन जलवाहिन्यांच्या कार्यान्वितीसाठी ५ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११ पासून ६ फेब्रुवारी २०२५ संध्याकाळी ५ पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील 'या' पाच भागात 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, तुमच्या विभागात काय असणार स्थिती?
water
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 10:20 PM

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. मुंबईत 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे बुधवारी 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून गुरुवारी 6 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असे एकूण 30 तास काही भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार एस, एल, के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर अशा पाच विभागाचा पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे कारण काय?

पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व आणि पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशतः खंडित केल्या जाणार आहेत. तसेच नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी साधारण ३० तास लागणार आहेत. यामुळे एस, एल, के पूर्व , एच पूर्व, आणि जी उत्तर विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

‘या’ विभागात पाणीपुरवठा बंद

१) एस विभाग : श्रीरामपाडा, खिंडीपाडा, तुळशेतपाडा, मिलिंद नगर. नरदास नगर, शिवाजी नगर, मरोडा हिल, भांडुप (पश्चिम), गौतम नगर, फिल्टर पाडा, महात्मा फुले नगर, पासपोली गाव, तानाजीवाडी उदंचन केंद्र, मोरारजी नगर. सर्वोदय नगर, गावदेवी टेकडी. तुळशेतपाडा, टेंभीपाडा, नरदास नगर, रमाबाई नगर १ आणि २, साई हिल भांडुप जलाशय येथून होणारा पाणीपुरवठा (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

एस विभाग : क्वारी मार्ग, प्रताप नगर मार्ग, जंगल मंगल मार्ग, टेंभीपाडा, गावदेवी मार्ग, दत्त मंदीर मार्ग, लेक मार्ग, सोनापूर जंक्शन ते मंगतराम पेट्रोल पंपपर्यंतचा लालबहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, भांडुप (पश्चिम), शिंदे मैदान जवळील परिसर, प्रताप नगर मार्ग, फुले नगर टेकडी, रामनगर उदंचन केंद्र, रावते कंपाऊंड उदंचन केंद्र, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, (नवीन हनुमान नगर) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

२) एल विभाग : कुर्ला दक्षिण – काजूपाडा, सुंदरबाग, नवपाडा, हलावपूल, न्यू मील मार्ग, कपाडिया नगर, नवीन म्हाडा वसाहत, परिघखाडी, तकिया वॉर्ड, महाराष्ट्र काटा, गफुर खान इस्टेट, पाईप लाईन मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग (पूर्व व पश्चिम), क्रांती नगर, संभाजी चौक, रामदास चौक, अण्णा सागर मार्ग (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

एल विभाग : कुर्ला उत्तर – ९० फीट रोड, कुर्ला – अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर – अंधेरी जोडरस्ता, साकीविहार मार्ग, मारवा उद्योग मार्ग भाग, सत्यनगर पाईपलाईन (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

३) जी उत्तर विभाग : धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मीन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

जी उत्तर विभाग : जस्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, ६० फीट मार्ग, ९० फीट मार्ग, संत कक्कया मार्ग, एम. पी. नगर धोरवडा, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

४) के पूर्व विभाग : विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओॲसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग : ओमनगर, कांतीनगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक क्षेत्र) सहार गाव, सुतारपाखाडी (पाईपलाईन क्षेत्र) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग : आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिप्झ- मुलगाव डोंगरी, एम. आय. डी. सी., मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग : चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर रोड, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांतीनगर (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग : कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी. ऍन्ड. टी. वसाहत (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

५) एच पूर्व विभाग : वांद्रे टर्मिनस (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

एच पूर्व विभाग : ए. के. मार्ग, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहराम पाडा, खेरनगर, निर्मल नगर (वांद्रे पूर्व) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

महापालिकेच्या सूचना काय?

ज्या परिसरात पाणीपुरवठा बंद असेल, त्या परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद असण्याच्या अगोदरच्या दिवशी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकारात्मक चर्चेची संधी होती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा
सकारात्मक चर्चेची संधी होती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा.
संतोष देशमुखांच्या 3 तासांच्या अमानुष मारहाणीचे 15 व्हिडिओ, 8 फोटो
संतोष देशमुखांच्या 3 तासांच्या अमानुष मारहाणीचे 15 व्हिडिओ, 8 फोटो.
वाल्मिक कराडचे धमकीचे फोन रेकॉर्ड आले समोर, अडचणी वाढणार
वाल्मिक कराडचे धमकीचे फोन रेकॉर्ड आले समोर, अडचणी वाढणार.
मुंबईत राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी..
मुंबईत राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी...
शिंदेच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना आमनेसामने; कार्यकर्ते आक्रमक
शिंदेच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना आमनेसामने; कार्यकर्ते आक्रमक.
एसटी महामंडळात यापुढे आयपीएस अधिकारी नेमणार; माधुरी मिसाळ यांचा निर्णय
एसटी महामंडळात यापुढे आयपीएस अधिकारी नेमणार; माधुरी मिसाळ यांचा निर्णय.
मंत्री रक्षा खडसे आणि आरोपी मोरेची ऑडिओ क्लिप व्हायरल
मंत्री रक्षा खडसे आणि आरोपी मोरेची ऑडिओ क्लिप व्हायरल.
पद नाही राज्य महत्वाचं; मविआचा चहापानावर बहिष्कारचा निर्णय
पद नाही राज्य महत्वाचं; मविआचा चहापानावर बहिष्कारचा निर्णय.
धक्कादायक! आधी चाकूचा धाक दाखवून बलात्कार, नंतर दागिने अन् घर लुटलं
धक्कादायक! आधी चाकूचा धाक दाखवून बलात्कार, नंतर दागिने अन् घर लुटलं.
कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा; देशमुख कुटुंबाची मागणी
कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा; देशमुख कुटुंबाची मागणी.