Mumbai Fire : बोरीवलीतील इमारतीच्या 14व्या मजल्यावरील आगीत 14 जण अडकले! मुंबईच्या इमारतीत पुन्हा अग्नितांडव
Borivali Fire : शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ठिणगी पडून आग भडकली, अशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईमध्ये इमारतीमध्ये आग (Mumbai Fire) लागण्याच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. शनिवारी रात्री रात्री मुंबईतील एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 14 जण अडकले होते. सुदैवानं या सर्व जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तसंच त्यांना सुखरुप बाहेरही काढण्यात आलंय. बोरिवलीतील (Mumbai Borivali Fire) इमारतीमध्ये लागलेल्या या आगीच्या (Mumbai Fire News) घटनेनं एकच खळबळ उडाली होती. आग लागल्याचं समजताच तत्काळ अग्निशमन दलाला कळवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्यानं मोठा अनर्थ टळलाय. तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली होती. नेमकी कोणत्या कारणामुळे ही आग भडकली होती, हे कळू शकलेलं नाही. मात्र या भीषण अग्नितांडवातून चौदा जणांचा जीव अगदी थोडक्यात वाचलाय.
बोरीवलीत कुठे अग्नितांडव?
बोरीवली परिरात असलेल्या धीरज सवेरा या इमारतीमध्ये आग भडकली होती. इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर ही लागली. रात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीने एकच घबराट पसरली होती. ही आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवान लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आलं.
Maharashtra | Fire broke out on the 14th floor of a building ‘Dheeraj Savera’ in Mumbai’s Borivali. Six fire tenders rushed to the spot. 14 people trapped in two apartments were rescued by the fire brigade. No casualties were reported. Fire has been brought under control. pic.twitter.com/CaDIWVkTKK
— ANI (@ANI) June 18, 2022
अग्निशमन दलाच्या एकूण सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. तसंच आगीत अडकलेल्या चौदाही जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. चौदाव्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या ज्वाळा खिडकीतून बाहेर फेकल्या जात होत्या. चौदाव्या मजल्यावरील आग इतरत्र पसरु नये, यासाठी अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न केले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं.
#Video : Borivali Fire, मुंबईच्या आलीशान इमारतींमधील आगीच्या वाढत्या घटना काळजी वाढवणाऱ्या आहेत. बोरिवलीत पुन्हा अग्नितांडव, रविवारी पहाटे लागलेल्या आगीत सुदैवानं कुणाचाही जीव गेला नाही. पण मोठं आर्थिक नुकसान #Mumbai pic.twitter.com/t0WQJjHR7n
— Siddhesh Sawant (@ssidsawant) June 19, 2022
कशामुळे आग लागली होती?
शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ठिणगी पडून आग भडकली, अशी माहिती देण्यात आली आहे. चौदाव्या मजल्यावरील एकूण दोन फ्लॅट्स आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात फ्लॅट्समधील मौल्यवान सामान जळून खाक झालंय. त्यामुळे कुटुंबीयांचं मोठं नुकसान झालंय.