Byculla Vidhasabha Constituency : भायखळा मतदारसंघात कुणाचं पारडं जड? वाचा सविस्तर बातमी…
Byculla Vidhasabha Constituency Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातील काय स्थिती आहे? या मतदारसंघात कुणाचं वर्चस्व आहे? या मतदारसंघात कुणाचा अधिक प्रभाव आहे? वाचा सविस्तर बातमी...
राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. यंदाची ही निवडणूक अत्यंत अटीतटीची असणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत अत्यंत अटीतटीचा सामना असणार आहे. अशात शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबईतही चुरशीची लढत होणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात अनेक ठिकाणी सामना होणार आहे. मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात (Byculla Vidhasabha Constituency) यंदा काय स्थिती आहे? याबाबत जाणून घेऊयात….
भायखळा या विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिमी जाधव या विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर भायखळा मतदारसंघातील समीकरणं बदलली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता यंदा या मतदारसंघात कोण जिंकणार? याची चर्चा होत आहे.2019 यामिनी यशवंत जाधव यांना 51 हजार 180 मतं मिळाली होती. वारिस पठाण यांना दुसऱ्या क्रमांकाची 31 हजार 157 मतं मिळाली होती. महाविकास आघाडीदेखील पूर्ण ताकदीने या मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी तयारी करत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून या मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे.
कुणाचं वर्चस्व?
2014 पर्यंत भायखळा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण 2014 नंतर इथे परिस्थिती बदलली. 2014 ला एमआयएमचे वारिस पठाण या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर 2019 ला वारिस पठाण यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा या मतदारसंघात विजय झाला. यंदा मात्र या मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांनी अरविंद सावंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र भायखळा या त्यांच्या मतदारसंघात देखील त्या पिछाडीवर होत्या. त्यामुळे या मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मतदारांची संख्या किती?
2019 ला या मतदारसंघातील मतदारांची संख्या समोर आली होती. त्या रिपोर्टनुसार, 1 लाख 23 हजार 616 पुरुष मतदार आहेत. तर 1 लाख 03 हजार 620 इतकी महिला मतदारांची संख्या आहे. 2 लाख 27 हजार 143 इतके एकूण मतदार आहेत. ही 2019 ची आकडेवारी आहे. या आकडेवारीत बदल झालेला असेल.