भल्या सकाळी ब्रिजवर बर्निंग कारचा थरार, वाहतूक काही काळ ठप्प, कुठे घडली घटना?

माटुंगा ब्रिजवर अगदी सकाळीच ही भीषण घटना घडली. ही कार नेमकी कुणाची होती, त्याचे मालक कोण होते, याची माहिती पोलीस घेत आहेत.

भल्या सकाळी ब्रिजवर बर्निंग कारचा थरार, वाहतूक काही काळ ठप्प, कुठे घडली घटना?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 8:41 AM

मुंबईः सकाळीच आपापल्या कामांना निघालेल्या मुंबईकरांना (Mumbaikar) आज भीषण घटना पहायला मिळाली. माटुंगा ब्रिजवर (Matunga Bridge) एका (Burning Car) अचानक पेट घेतला. सुमारे अर्धा ते पाऊण तास ही कार जळत राहिली. त्यामुळे ब्रिजवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना काही काळ रोखून धरावं लागलं. सुदैवाने कार चालकाने काही दुर्देवी घटना होण्यापूर्वीच कारमधून उडी घेतली. त्यामुळे तो सुरक्षित बचावला आहे.

अग्निशमक दल घटनास्थळी

ही आग लागल्यानंतर कार चालकाने कारमधून उडी मारली. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. काही क्षणात कारने मोठा पेट घेतला. कारमधून निघणारे आगीचे लोट आणि ज्वाला पाहून ब्रिजवरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांनी ही भीषणता अनुभवली. ब्रिजवरून जाणाऱ्या प्रवाशांनीच अग्निशमक दलाला फोन करून सदर घटनेची माहिती दिली. अग्निशमक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पाण्याच्या मोठ्या फवाऱ्यांद्वारे ही आग विझवण्यात आली.

काही काळ वाहतूक ठप्प

फायर ब्रिगेडचे कर्मचारी येऊन त्यांनी आग विझवेपर्यंत माटुंगा ब्रिजवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या आगीमुळे इतर वाहनांना नुकसान होऊ नये, इतर दुर्दैवी घटना घडू नये म्हणून काही अंतरावर वाहनांना रोखण्यात आलं होतं. मुंबई पोलीस, वाहतूक शाखेचे अधिकाऱ्यांमार्फत वाहतूक नियंत्रण करण्यात आलं.

आग विझवल्यानंतर कार बाजूला करण्यात आली आणि त्यानंतर माटुंगा ब्रिजवरील वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली.

आग का लागली?

माटुंगा ब्रिजवर अगदी सकाळीच ही भीषण घटना घडली. ही कार नेमकी कुणाची होती, त्याचे मालक कोण होते, याची माहिती पोलीस घेत आहेत. तसेच आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचाही तपास सुरु आहे. आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र ही घटना कुणाच्या जीवावर बेतली नाही, हे पाहून प्रवाशांना दिलासा मिळाला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.