Mumbai Central mall fire : मुंबईतील नागपाड्यातील मॉलमधील आग धुमसतीच, अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी
मुंबईच्या नागपाडा भागातील सिटी सेंटर मॉलला काल (22 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली.(Mumbai Central mall fire in Nagpada area)
मुंबई : मुंबईच्या नागपाडा भागातील सिटी सेंटर मॉलला काल (22 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. गेल्या 11 तासांपासून ही आग नियंत्रणासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. मात्र अद्याप ही आग आटोक्यात आलेली नाही. या आगीत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai Central mall fire in Nagpada area)
मुंबई सेंट्रलजवळील बस स्थानकाच्या जवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला काल (22 ऑक्टोबर) रात्री सुमारे 8 वाजून 53 मिनिटांनी आग लागली. एका दुकानात झालेल्या शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यानंतर हवेमुळे ही आग संपूर्ण मॉलमध्ये पसरली. त्यामुळे सिटी सेंटर मॉलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील दुकानही आगीच्या कचाट्यात सापडली आहेत.
#UPDATE: Two fire personnel injured during the firefighting operation at a mall in Mumbai’s Nagpada area. https://t.co/K8Suf4ZQq8
— ANI (@ANI) October 23, 2020
या आगीचं भीषण रुप पाहता अग्निशमन दलाकडून लेव्हल 5 ची आग असल्याचं जाहीर करण्यात आलं. अग्निशमन दलाकडून 24 बंब आणि 11 टँकरद्वारे ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. जवळपास 250 अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीबाबत
मुंबई सेंट्रल येथे मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या जवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला काल (दिनांक २२ ऑक्टोबर २०२०) रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी आग लागली. pic.twitter.com/0rGymsXCCx
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 23, 2020
सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या 55 मजली इमारतीतील अंदाजे 3 हजार 500 रहिवाशांचे जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून दिली जात आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले आहे. सिटी सेंटर मॉल आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 23, 2020
मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले आहे. सिटी सेंटर मॉल आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोड हा दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Around 250 Fire Brigade Officers and Jawans are trying hard to control the fire.@MumbaiPolice are also on the spot.
No fatalities are reported. 2/2#MyBMCUpdates pic.twitter.com/4P4L0ZuA8b
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 23, 2020
(Mumbai Central mall fire in Nagpada area)
संबंधित बातम्या :