मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यामुळे मुंबईत अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मुंबईतील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री तात्काळ बंद करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Mumbai Central railway Platform tickets Sell Off)
मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तातडीने बंद करण्यात आल्या आहेत. यात मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिन्स, कल्याण, ठाणे, दादर, सीएसएमटी या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या ठिकाणच्या सर्व प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवल्या जाणाऱ्या आहेत.
दरम्यान दुसरीकडे वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारनं कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच मुंबईसह उपनगरीय लोकल रेल्वेवर पुन्हा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे.
“राज्यात तसेच मुंबईत कोरोना संसर्ग वाढत आहे. सामान्यांचा रोजगार बुडत होता म्हणून मागच्या वर्षी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकल पूर्ण बंद करावी किंवा मागच्या वेळेस लोकल सेवेला जे निर्बंध होते ते घालावेत; यावर राज्य सरकारचा विचार सुरु आहे. त्यावर लवकरच विचार केला जाईल,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
मुंबईतील कोरोना स्थिती काय?
मुंबईत गुरुवारी 8937 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 23 रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 48 हजार 902 चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत बाधितांचे प्रमाण 18.27 टक्के आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या 86 हजारांच्यापुढे गेली आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी एक महिन्यावर आला आहे. (Mumbai Central railway Platform tickets Sell Off)
#CoronavirusUpdates
८ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ८९३८
२४ तासात बरे झालेले रुग्ण- ४५०३
बरे झालेले एकूण रुग्ण- ३,९२,५१४
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८०%एकूण सक्रिय रुग्ण- ८६,२७९
दुप्पटीचा दर- ३३ दिवस
कोविड वाढीचा दर (१ एप्रिल-७ एप्रिल)- २.०३%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 8, 2021
संबंधित बातम्या :