Central Railway: स्वच्छता गृहातील कमोड स्वच्छ राखण्यासाठी मध्य रेल्वेची अनोखी आयडिया
रेल्वे प्रसाधन गृहातील कमोड आता खराब होणार नाहीत, दुर्गंधी दूर ठेवण्यासाठी ही अनोखी कल्पना
अतुल कांबळे, Tv9, मुंबई : रेल्वेच्या सार्वजनिक प्रसाधनगृहात जाण्याची वेळ आल्यास बरेचदा नाक मुठीत धरूनच प्रवेश करण्याचे धाडस करावे लागते. परंतू मध्य रेल्वेने (Central Railway) आपल्या विदेशी पद्धतीच्या कमोड कव्हर बसविण्याचा एक अनोखा उपक्रम आखला आहे, सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय सीएसएमटी (CSMT) स्थानकात राबवला जाणार आहे, यामुळे सार्वजनिक स्वच्छता गृहात स्वच्छता राखण्यास रेल्वेला मदत होणार आहे. यामुळे प्रवाशांना देखील दुर्गंधीपासून मुक्ती मिळणार आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता राखणे रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनने नवीन आयडीया आणली आहे. त्यामुळे टॉयलेट (Toilet) वापरणार्यांना दृष्टीने काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे.
An automatic ‘seat cover lift up arrangement’ in western style toilets at CSMT on experimental basis (Most of the people do not lift up the seat cover before urinating, which makes it unhygienic for others) Paseengers are welcome 2 share their experiences. -Concept by DRM,Mumbai pic.twitter.com/KxOATmdG5v
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) November 23, 2022
हे सुद्धा वाचा
बरेचदा प्रवासी नेहमी कमोडचं वरील झाकण न काढताच त्यावर लघुशंका उरकत असतात, त्यामुळे त्या झाकणावर शिंतोंडे उडून त्याची दुर्गधी पसरत राहते. तसेच त्यानंतर जाणाऱ्या प्रवाशांना कमोडच्या झाकणाला हात लावण्याचे काही धाडस होत नाही, अशा प्रवाशांची चिंता आता दूर होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई डीव्हीजनने कमोडच्या तोडावरील झाकणालाच स्प्रिंग बसविल्याने, हे झाकण सतत उघड्या स्थितीत राहते. यामुळे या जागेवर कुणी बसत नाही. हे झाकण उघडेच राहत असल्याने झाकण न उघडताच त्यावर लघुशंका करणाऱ्यांवर अटकाव होणार आहे. मध्य रेल्वेच्या या आयडीयाच्या कल्पनेचे स्वागत होत आहे.