Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत हवाई रुग्णवाहिकेचे ‘Emergency Landing’, टेक ऑफ दरम्यान चाक निखळले, सर्वजण सुखरुप

वैमानिकाने प्रसंगावधान राखत ‘बेली लँडिंग’ प्रकारे हे विमान मुंबई विमानतळावर सुखरुप उतरवले. (Mumbai Air Ambulance Emergency Landing)

मुंबईत हवाई रुग्णवाहिकेचे ‘Emergency Landing’, टेक ऑफ दरम्यान चाक निखळले, सर्वजण सुखरुप
air-ambulance-
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 7:04 AM

मुंबई : नागपूरहून हैदराबादला (Hyderabad) जाणाऱ्या एका हवाई रुग्णवाहिकेचे (Air Ambulance) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. या विमानात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्याची इमर्जन्सी लँडिग करावी लागली. या विमानात 1 रुग्ण, 1 डॉक्टर, 1 नर्स आणि वैमानिकांसह एकूण सात जण  होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.  (Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Air Ambulance Emergency Landing)

चाक निखळून पडल्याची माहिती 

मिळालेल्या माहितीनुसार, C-90 VT-JIL हे बीचक्राफ्ट कंपनीचे विमान होते. या विमानाने रात्री 8 च्या सुमारात नागपूरहून हैदराबादला जाण्यासाठी उड्डाण घेतले. त्यावेळी त्यात 1 रुग्ण, 1 डॉक्टर, 1 नर्स आणि वैमानिकांसह एकूण सात जण  होते. नागपूर विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा उजव्या चाकात बिघाड झाला. त्यामुळे ते चाक निखळून पडल्याची माहिती वैमानिकाला मिळाली. त्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत ‘बेली लँडिंग’ प्रकारे हे विमान मुंबई विमानतळावर सुखरुप उतरवले.

प्रवाशी नानावटी रुग्णालयात दाखल

यावेळी त्या हवाई रुग्णवाहिकेत एक रुग्ण होता. यावेळी त्या विमानातील वैमानिकाने त्याचे सर्व कसब पणाला लावून याची लँडिग केली. हवेत जवळपास आठ घिरट्या घेतल्यानंतर विमान सुखरुप खाली उतरवण्यात आले. या दरम्यान विमानाला आग लागण्याची भीती होती. त्यामुळे मुंबई विमानतळ प्रशासनाने अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिकेसह इतर सर्व गोष्टी सज्ज करुन ठेवल्या होत्या.

हे विमान खाली उतरवल्यानंतर त्यातील प्रवाशांना तात्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या इमर्जन्सी लँडिंग दरम्यान अग्निशमन दलाने काही तास विमानावर पाण्याचा मारा केला. त्यामुळे त्या विमानाची उष्णता शांत झाली.

बेली लँडिंग म्हणजे काय?

बेली लँडिंग किंवा गिअर-अप लँडिंग म्हणजे जेव्हा एखादे विमान लँडिंग गिअरशिवाय लँड करते. त्यावेळी ते मुख्य लँडिंग डिव्हाईस म्हणून त्याच्या खाली असलेल्या किंवा बेलीचा वापर करते. सामान्यत: गिअर-अप लँडिंग हे पायलट लँडिंग गिअर वाढवण्यास विसरल्यानंतर केली जाते किंवा पायलट तांत्रिक बिघाडामुळे लँडिंग गिअर वाढवण्यास सक्षम नसतो. त्या परिस्थितीदरम्यान बेली लँडिंग केली जाते.  (Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Air Ambulance Emergency Landing)

संबंधित बातम्या :

Corona Vaccine : लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंची महापालिका आयुक्तांशी चर्चा

मुंबईकरांनो लक्ष द्या, ‘कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’नुसारच लसीकरण

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.