मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! दोन दिवस 5 ते 10 टक्के पाणीकपात

मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलवाहिनीच्या 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! दोन दिवस 5 ते 10 टक्के पाणीकपात
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 9:10 AM

Mumbai Water Cut : मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलवाहिनीच्या 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत आज आणि उद्या दोन दिवस 5 ते 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दोन दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात मुख्यत: वैतरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमध्ये ताराळी (जिल्हा ठाणे) येथे 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे ही जलवाहिनी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेतर्फे 5 ते 10 टक्के पाणीकपात

वैतरणा जलवाहिनीच्या झडपेमधील बिघाडामुळे भांडुपमधील जलशुद्धीकरण केंद्रास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये 5 ते 10 टक्के घट झाली आहे. यामुळे संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गुरूवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024 ते शुक्रवार 18 ऑक्टोबर 2024 या दोन दिवसांसाठी पाणीकपात केली जाणार आहे. ही पाणी कपात संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरात 5 ते 10 टक्के इतकी असणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पाणी जपून वापरावे, असा सल्ला मुंबई महापालिकेने दिला आहे.

पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला

वैतरणा जलवाहिनीच्या 900 मिलीमीटर झडपेमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी साधारण 48 तास लागणार आहेत. दुरुस्‍ती करण्‍याचे काम तातडीने हाती घेण्‍यात आले आहे. मात्र याला साधारण दोन दिवस लागणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रात आज आणि उद्या दोन दिवस 5 ते 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. या दरम्यान नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.