कंगनाची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली, मुंबई पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार

कंगनाने तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचे सांगत मुंबई दिवाणी न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे. (Kangana Ranaut khar home)

कंगनाची 'ती' याचिका न्यायालयाने फेटाळली, मुंबई पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 8:01 AM

मुंबई : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येणारी अभिनेत्री कंगना रनौत अडचणीत आली आहे. कंगनाने (Kangana Ranaut) तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचे सांगत मुंबई दिवाणी न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे. तसेच पालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने कंगनाने खार इथल्या तिच्या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत पालिका हे बांधकाम तोडू शकते असा निकाल दिला होता. या निकालाला कंगनाने आव्हान देत पालिकेला कारवाई करण्यापासून थांबवण्याची मागणी केली होती. कंगनाची हीच मागणी मुंबईतील दिवाणी न्यायलयाने फेटाळली आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणींत वाढ झाली आहे. (Mumbai civil court rejected the petition of Kangana Ranaut and said that she ruled out the construction plan)

नेमकं प्रकरण काय ?

खार पश्चिममधील डी. बी. ब्रिझ इमारतीत कंगनाने एकाच माळ्यावरील 3 फ्लॅट एकत्र केले आहेत. या बांधकामात तिने मंजूर आराखड्याव्यतिरिक्त वाढीव जागा अतिक्रमित केल्याचा आरोप पालिकेने केला केलेला आहे. याविरोधात पालिकेने कंगनाला नोटीस पाठवली होती. त्यानंतर हा खटल्यावर दिंडोशी न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. त्यानंर न्यायालयाने या खटल्यामध्ये कंगनाने तिच्या घरात अनधिकृत बांधकाम केल्याचं न्यायालयाने म्हटलं होतं.

तसेच, न्यायालयाने या निर्णयाला आव्हान देण्यासाठी कंगनाला 6 आठवड्यांची मुदत दिली आहे. सहा आठवड्यांच्या आत कंगनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले नाही, तर कंगनने केलेल्या अनधिकृत बांधकामाला पाडण्यास न्यायालयाने मुभा दिली होती. कंगनाने केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात तिला 2018 साली नोटीस देण्यात आली होती.

नोटिशीत उल्लंघनाचा स्पष्ट उल्लेख नाही; कंगनाच्या वकिलांचा युक्तिवाद

दरम्यान, कंगनाने पालिकेच्या नोटिशीविरोधात मुंबई दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी तिने पालिकेनं पाठवलेल्या नोटिशीत उल्लंघन केलेल्या नियमांचा स्पष्टपणे उल्लेख केलेला नसल्याचा युक्तिवाद केला. कंगनाची बाजून अ‌ॅड. रिजवान सिद्दीकी यांनी मांडली. त्यांचा हा युक्तीवाद अ‌ॅ़ड. धर्मेश व्यास यांनी खोडून काढला. धर्मेश मुंबई महापालिकेची बाजू मांडत आहेत. मुंबई महापालिकेच्या अभियंत्याने अभिनेत्री कंगना रनौतच्या घराचं सर्वेक्षण केलेलं आहे. त्यानंतर कंगनाने ज्या 8 नियमांचे उल्लंघन केलेले आहे, त्याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला असल्याचं व्यास यांनी म्हटलं. त्यांतनर मुंबई दिवाणी न्यायालयाने कंगनाची याचिका फेटाळून लावली.

संबंधित बातम्या :

Kangana Ranaut | कंगनाला ट्विटरवर मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार, हायकोर्टाचा दिलासा!

कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याची मागणी

(Mumbai civil court rejected the petition of Kangana Ranaut and said that she ruled out the construction plan)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.