आम्हाला निधी मिळत नाही, आम्ही मुख्यमंत्री शिंदेंचा…; काँग्रेसच्या महिला आमदार संतापल्या

| Updated on: Jan 31, 2024 | 3:20 PM

Congress MLA Varsha Gaikwad on CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चुकीचा पायंडा पाडतायेत, त्यांचा निषेध; काँग्रेसच्या महिला आमदाराकडून एकनाथ शिंदेंवर निशाणा... टीव्ही 9 मराठीशी बोलताना काँग्रेसच्या आमदाराकडून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. वाचा...

आम्हाला निधी मिळत नाही, आम्ही मुख्यमंत्री शिंदेंचा...; काँग्रेसच्या महिला आमदार संतापल्या
Follow us on

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 31 जानेवारी 2024 : काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. निधीवाटपाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. आम्हाला आमदार निधी मिळत नाही, म्हणून आम्ही या पूर्वीच आवाज उठवला होता. निधीबाबत सरकार दुजाभाव करत आहे. सत्ताधाऱ्यांना निधी मिळतो आम्हाला मिळत नाही आणि आरटीआयच्या माध्यमातून ते उघड झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चुकीचा पायंडा पाडत आहेत. आमचा त्यांना विरोध आहे आणि त्यांच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

“विरोधी पक्षातील आमदारांना निधी नाही”

मला एका गोष्टीचा वाईट वाटतं की जनतेचं नुकसान सरकार का करू पाहत आहे? म्हणजे जे तुमच्या पक्षात आले त्यांना निधी द्यायचा. जे काऊन्सिलर माझ्या वॉर्डातील होते ते शिंदे गटात गेले त्यांना तुम्ही कैक कोटींचा निधी देता. जे सिटींग आमदार आहेत त्यांना तुम्ही निधी देत नाही. आमच्या इथे डीपीडीसीचा पण निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मिळालेला नाहीये. या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू, असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

चौकशी करा -गायकवाड

मुंबईच्या पालकमंत्र्यांना निधी वाटप करण्याचा कोणी अधिकार दिलेला आहे. हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा विषय आहे. जर यामध्ये गैरव्यवहार झाला असेल. तर विरोधकांना, आमदारांना जर निधी मिळाला नसेल तर यासाठी जबाबदार कोण आहे याची रितसर चौकशी व्हायला पाहिजे, असंही वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.

वर्षा गायकवाड यांचा सरकारला इशारा

महालक्ष्मी रेस कोर्सची जागा आहे ती सरकारी जागा आहे. ती लोकांच्या हितासाठी राखीव ठेवलेली जागा आहे. अशाच पद्धतीने जर ओपन स्पेस सरकार त्यांच्या मित्रांच्या घशात घालत असेल. जवळच्या व्यवसायिकांच्या बिल्डरांच्या घशात घालत असतील. तर मग मुंबईचा तापमान वाढेल. मुंबईमध्ये प्रदूषण वाढलेला आहे. जगामध्ये मुंबई प्रदूषणामध्ये नंबर एक होत आहे. याची दखल साधी मुख्यमंत्र्यांना घेता येत नसेल तर मग हे कसं सरकार चालवतात हा मोठा प्रश्न आहे. महालक्ष्मी रेस कोर्सच्या पुनर्विकासाला आमचा कायम विरोध राहील आणि प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, असा गंभीर इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.