Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 4000 बेड शिल्लक, आवडत्या रुग्णालयाची वाट न पाहण्याचं आवाहन

गेल्या सात दिवसात विविध रुग्णालयात 3 हजार कोव्हिड बेड तयार करण्यात आले आहेत. (Mumbai corona 4000 beds left)

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 4000 बेड शिल्लक, आवडत्या रुग्णालयाची वाट न पाहण्याचं आवाहन
कोरोना रुग्णांसाठी बेड्सची कमतरता
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 11:39 AM

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांसाठी महापालिका प्रशासनाकडून बेडचे नियोजन केले जात आहे. गेल्या सात दिवसात विविध रुग्णालयात 3 हजार कोव्हिड बेड तयार करण्यात आले आहेत. मुंबईत बेडची संख्या 12 हजार 906 वरुन 15 हजार 971 इतकी वाढली आहे. मात्र वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईत सध्या 4000 बेड शिल्लक आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी याबाबतची माहिती दिली आहे. (Mumbai 4000 beds left for corona patients)

आवडते रुग्णालय किंवा बेडची वाट पाहू नका

मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत विविध रुग्णालयात गेल्या सात दिवसात 3000 कोविड बेड तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे बेडची संख्या 12 हजार 906 वरुन 15 हजार 971 इतकी झाली आहे. मुंबईत सध्या 4000 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईतील रुग्णांनी आवडीनुसार बेडची वाट बघू नये. सर्व ठिकाणी प्रोटोकॉलसारखे उपचार केले जातात. आवडत्या रुग्णालयाची किंवा बेडची प्रतीक्षा करुन उगाच रोगाची तीव्रता वाढवू नका, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.

कोविड रुग्णांसाठी पुन्हा बेड वाढवण्यात येणार

मुंबईत रुग्णसंख्या वाढल्याने पालिकेचे बेड नियोजन सुरु आहे. मुंबईत दररोजची रुग्णसंख्या थेट आठ हजारांवर गेली आहे. त्यामुळे पालिकेने वेगाने बेड वाढवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मुंबईतील 69 नर्सिंग होमही ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेला दररोज शेकडो बेडची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे याआधी खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड आणि 100 टक्के आयसीयू पालिकेने ताब्यात घेतले आहेत. यानंतर आता 69 नर्सिंग होमही ताब्यात घेण्यात येत आहेत. जानेवारीमध्ये मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे या नर्सिंग होममध्ये ‘नॉन कोविड’ रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता या ठिकाणी कोविड रुग्णांसाठी पुन्हा आवश्यकतेनुसार बेड वाढवण्यात येणार आहेत.

शासनाच्या दरपत्रकानुसार शुल्क आकारण्याचे निर्देश

मुंबईतील 30 ते 35 बडय़ा खासगी रुग्णालयांमध्येही कोविड रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.या ठिकाणी शासनाच्या दरपत्रकानुसार शुल्क आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावर नजर ठेवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांचीही नेमणूकही करण्यात आली आहे.

राज्यात 24 तासांत 49 हजार नवे रुग्ण

दरम्यान, दरम्यान राज्यात 3 एप्रिल रोजी एका दिवसात कोरोनाचे तब्बल 49447 नवे रुग्ण आढळले. तसेच तीन एप्रिलला दिवसभरात तब्बल 277 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून 3 एप्रिलला दिवसभरात प्रथमच कोरोना रुग्ण 50 हजाराच्या जवळपास गेले. या आकडेवारीमुळे राज्य सरकार तसेच आरोग्य विभाची डोकेदुखी वाढली असून लॉकडाऊन लागू करण्याबाबत राज्य सरकारकडून विचार केला जात आहे.

राज्यातील मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत कोरोनानं अक्षरशः कहर केला आहे. शनिवारी कोरोनाचे 9,090 रुग्ण सापडल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. मुंबईत सद्यस्थितीत 62 हजार 187 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Mumbai 4000 beds left for corona patients)

संबंधित बातम्या : 

कोरोनाला थोपवण्यासाठी मुंबईचे ‘मिशन लसीकरण’, रविवारीसुद्धा लोकांना लस मिळणार

Mumbai Corona | मुंबईत कोरोनाचे चार नवे हॉटस्पॉट, सर्वाधिक सक्रीय रुग्ण अंधेरीत, कोणत्या वॉर्डात किती?

चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.
संतापजनक! 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग
संतापजनक! 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग.
तुळजापूर ड्रग्स प्रकरण; पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची प्रतिक्रिया
तुळजापूर ड्रग्स प्रकरण; पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची प्रतिक्रिया.
पुणे गर्भवती प्रकरण, भिसे कुटुंबाला मानसिक त्रास, चाकणकरांकडून निर्देश
पुणे गर्भवती प्रकरण, भिसे कुटुंबाला मानसिक त्रास, चाकणकरांकडून निर्देश.
'आमच्या राजाला न्याय पाहिजे', मस्साजोगच्या ग्रामस्थांनी लावले बॅनर
'आमच्या राजाला न्याय पाहिजे', मस्साजोगच्या ग्रामस्थांनी लावले बॅनर.
'चमकू शुक्ला तू वाट चुकला, आता तुझी..', शुक्लांना थेट मनसेचा इशारा
'चमकू शुक्ला तू वाट चुकला, आता तुझी..', शुक्लांना थेट मनसेचा इशारा.
मुंब्रा अत्याचार आणि हत्या प्रकरण; पीडितेच्या भावाचे गंभीर आरोप
मुंब्रा अत्याचार आणि हत्या प्रकरण; पीडितेच्या भावाचे गंभीर आरोप.
सरपंच हत्येला 4 महिने उलटले, धनंजय देशमुखांच्या बीड पोलिसांना एकच सवाल
सरपंच हत्येला 4 महिने उलटले, धनंजय देशमुखांच्या बीड पोलिसांना एकच सवाल.