मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटमध्ये रुग्णवाढीचा वेग मंदावला, कोणत्या वॉर्डात किती?

मुंबईत एका दिवसात 1 हजार 725 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 542 वर पोहोचली आहे. (Mumbai Corona Cases Live Update)

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटमध्ये रुग्णवाढीचा वेग मंदावला, कोणत्या वॉर्डात किती?
Follow us
| Updated on: May 25, 2020 | 3:28 PM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने 50 हजारांचा टप्पा पार केला (Mumbai Corona Cases Live Update) आहे. राज्यात काल दिवसभरात 3 हजार 041 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 इतकी झाली आहे. तर मुंबईत एका दिवसात 1 हजार 725 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता 30 हजार 542 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात एकूण 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 988 झाली आहे.

मुंबईतील कमी रुग्णसंख्या असलेल्या अनेक विभागांमध्ये रुग्णसंख्या वेगानं वाढत (Mumbai Corona Cases Live Update) आहे. मात्र मुंबईतील महत्त्वाच्या हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर मंदावला आहे. मुंबईतील एन वॉर्ड म्हणजे घाटकोपर परिसरात रुग्णवाढीचा दर सर्वाधिक 13.7 टक्के इतका आहे.

विशेष म्हणजे मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या वरळी म्हणजे जी दक्षिण विभागाचा रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे. जी दक्षिण विभागात रुग्णवाढीचा दर 3.4 टक्के आहे. तसेच रुग्णाचा डबलिंग रेटही 21 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील 8 वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा दर 8 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा दर 16 ते 22 मे दरम्यान 6.61 टक्के इतका आहे.

मुंबईत प्रत्येक विभागात आठवडाभरातील रुग्णसंख्या एकत्र करुन विभागाची सरासरी दैनंदिन रुग्णवाढ संख्या निश्चित केली जाते. प्रतिदिन रुग्णवाढीचा दर म्हणजे मागील दिवसाच्या तुलनेत त्या विभागात झालेल्या एकूण रुग्णवाढीची टक्केवारी असते.

मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा दर कोणत्या विभागात किती?

  • एन वॉर्ड – घाटकोपरचा भाग – 13.7 टक्के
  • पी नॉर्थ – मालाड, मालवणी, दिंडोशीचा भाग – 11.9 टक्के
  • टी वॉर्ड – मुलुंडचा भाग- 11.9 टक्के
  • पी साऊथ – गोरेगांवचा भाग – 10.9 टक्के
  • एस वॉर्ड – भांडुप, विक्रोळीतील भागाचा समावेश – 10 टक्के
  • आर साऊथ – कांदिवलीचा भाग – 9.4 टक्के
  • आर मध्य – बोरिवलीचा भाग – 8.9 टक्के
  • एफ साऊथ – परळ, शिवडीचा समावेश – 8.2 टक्के

तुलनेने रुग्णसंख्या वाढ कमी होत असणारे वॉर्ड

  • जी साऊथ – वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर – 3.4 टक्के
  • ई वॉर्ड – भायखळा, भायखळा फायर ब्रिगेडच्या आसपासचा भाग – 4.2 टक्के
  • डी वॉर्ड – नाना चौक ते मलबार हिल परिसर – 4.6 टक्के
  • एम ईस्ट – गोवंडी, मानखुर्दचा समावेश – 6.1 टक्के
  • एच ईस्ट – वांद्रे पूर्वचा भाग, वाकोला परिसर, कलानगर ते सांताक्रुझ (मातोश्री) – 7.4 टक्के
  • के वेस्ट – अंधेरी पश्चिमचा भाग – 5.5 टक्के
  • एल वॉर्ड – कुर्ला परिसराचा समावेश- 7.4 टक्के
  • जी नॉर्थ – दादर, माहिम, धारावी – 5.1 टक्के
  • के ईस्ट – अंधेरी पूर्वचा समावेश, जोगेश्वरी – 7.8 टक्के
  • एम वेस्ट – चेंबुरचा समावेश – 6.3 टक्के
  • एफ नॉर्थ – सायन, माटुंगा, वडाळा समावेश – 4.6 टक्के
  • एच वेस्ट – वांद्रे, सांताक्रुझ पश्चिमचा भाग – 7.5 टक्के
  • बी वॉर्ड – मशिद बंदर भाग – 6.3 टक्के
  • आर नॉर्थ – दहिसरचा भाग – 6.5 टक्के
  • ए वॉर्ड – कुलाबा, कफ परेड, फोर्टचा परिसर – 5 टक्के
  • सी वॉर्ड – पायधुणी, भुलेश्वर – 7.4 टक्के

(Mumbai Corona Cases Live Update)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात 50 हजारांचा टप्पा पार, दिवसभरात सर्वाधिक 3,041 नवे कोरोना रुग्ण

कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर, 24 तासात 6977 नवे रुग्ण

'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.