मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजारच्या उंबरठ्यावर, कोणत्या वॉर्डात किती रुग्ण?
मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबईतील धारावी परिसरात कोरोनाचे (Mumbai Corona Cases Ward Wise) रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत आहेत.
![मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजारच्या उंबरठ्यावर, कोणत्या वॉर्डात किती रुग्ण? मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजारच्या उंबरठ्यावर, कोणत्या वॉर्डात किती रुग्ण?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2020/03/31153920/mumbai-corona-virus.jpg?w=1280)
मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला (Mumbai Corona Cases Ward Wise) आहे. काल दिवसभरात 1 हजार 244 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 39 हजार 686 वर पोहोचली आहे. तर मुंबईत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 1 हजार 279 वर पोहोचला आहे.
मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबईतील धारावी परिसरात कोरोनाचे (Mumbai Corona Cases Ward Wise) रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईतील जवळपास 6 वॉर्डात जवळपास 2 हजारपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. यात धारावी, माहिम, माटुंगा, दादर या परिसरांसह इतर परिसरांचा समावेश आहे.
मुंबईतील वॉर्डनिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी
2 हजारपेक्षा जास्त रुग्ण असलेले वॉर्ड
- जी उत्तर वॉर्ड – धारावी, माहीम, दादर : 2728
- ई वॉर्ड – भायखळा, नागपाडा, माझगाव : 2438
- एफ उत्तर वॉर्ड – माटुंगा किंग सर्कल : 2377
- एल वॉर्ड – कुर्ला : 2321
- एच पूर्व वॉर्ड – बांद्रा, सांताक्रुझ पूर्व : 2094
- के पश्चिम वॉर्ड – अंधेरी पश्चिम : 2049
तर 2 हजारपेक्षा कमी रुग्ण असलेले वॉर्ड
- जी दक्षिण – वरळी, प्रभादेवी, एल्फिन्स्टन : 1905
- के पूर्व – अंधेरी पूर्व : 1875
- एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द : 1696
- एफ दक्षिण – परेल दादर पूर्व : 1648
- एन वॉर्ड – घाटकोपर : 1525
- एस वॉर्ड – विक्रोळी, भांडुप नाहूर : 1278
- आर उत्तर – दहिसर -309
(Mumbai Corona Cases Ward Wise)
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,487 रुग्णांची भर, कोरोनाबाधितांची संख्या 67,655 वर
Solapur Corona | सोलापुरात 891 कोरोनाबाधित, मृत्यूदर 9.42 टक्क्यांवर
रत्नागिरीत 24 तासात 36 जणांना कोरोना, कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?
गर्भवती महिलेला दाखल करुन घेण्यास 3 रुग्णालयांचा नकार, उपचारविना रिक्षातच मृत्यू