Corona : मुंबईत कोरोना मृत्यूदर जवळपास निम्म्याने घटला

या निष्कर्षांनुसार 17 ते 27 एप्रिल दरम्यान रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांवर गेला आहे.

Corona : मुंबईत कोरोना मृत्यूदर जवळपास निम्म्याने घटला
Follow us
| Updated on: Apr 30, 2020 | 12:22 AM

मुंबई :कोविड-19‘ या संसर्गजन्य आजाराने बाधित झालेल्या (Mumbai Corona Death Rate) रुग्णांच्या वाढीचा वेग बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मंदावत असल्याचा निष्कर्ष केंद्र शासनाद्वारे नियुक्त समितीने काढला आहे. या निष्कर्षांनुसार 17 ते 27 एप्रिल दरम्यान रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांवर गेला आहे. जो यापूर्वी 8.3 दिवस असा होता. देशाच्या पातळीवर रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी हा 9.5 दिवस एवढा आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर हा कालावधी 8.9 दिवस इतका (Mumbai Corona Death Rate) आहे.

केंद्रीय समितीने आपल्या निष्कर्षांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचे विश्लेषण करुन त्याआधारे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील बाधित रुग्णांचा मृत्यू दर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा कमी असल्याचे निरीक्षणही नोंदविले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर दर शंभर बाधित रुग्णांना मागे सरासरी 4.3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. तर बीएमसी क्षेत्रातील दर शंभर बाधित रुग्णांमागे सरासरी 3.9 रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. काही दिवसांपूर्वी बीएमसी क्षेत्रातील बाधित रुग्णांचा मृत्यूदर सरासरी 6.3 टक्के एवढा होता.

बीएमसी क्षेत्रातील ‘कोविड 19’ या संसर्गजन्य आजाराच्या प्रसारास अटकाव व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाद्वारे सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रात 11 मार्चला पहिला रुग्ण सापडला. 26 एप्रिलपर्यंत तब्बल 1 लाख 29 हजार 477 रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधण्यात आले. यातील 21 हजार 53 हे हाय रिस्क गटातील संपर्क होते. ‘कोविड 19’ चा प्रसार होऊ नये, म्हणून या रुग्णांच्या संपर्कातील लोकांपैकी ज्यांच्या घरी व्यवस्था होऊ शकते, अशा रुग्णांच्या बाबत घरच्याघरी विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात (Mumbai Corona Death Rate) आल्या.

बृहन्मुंबई महापालिकेने सातत्याने रुग्णांच्या जास्तीत जास्त वैद्यकीय चाचण्या करण्यावर भर दिला. यातून रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे शक्य झाले आहे. देशभरातील वैद्यकीय चाचण्यांच्या आकडेवारी पाहता देशभरात सर्वाधिक वैद्यकीय चाचण्या या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झाल्या आहेत.

कोरोना रुग्ण येण्याची वाट न पाहता पालिकेने ‘फिव्हर क्लिनीक्स‘च्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमधून रुग्णांचा शोध घ्यायला सुरुवात केली. यानुसार, आतापर्यंत 204 फिव्हर क्लिनीक्स मधून आपण 238 ‘कोरोना’ रुग्ण शोधले आहेत (Mumbai Corona Death Rate).

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.