मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच प्रमाणे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांचा मृत्यूचा दर हा 3.3 टक्के असला तरी एकूण कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे दरदिवशी होणारे मृत्यूही वाढत आहेत. (Mumbai Corona Patient Death Proportion)
गेल्या आठ दिवसांपासून मुंबईत दर दिवशी 50 हून अधिक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. या मृतांमध्ये 50 ते 60 वयोगटातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर त्यापाठोपाठ 60 ते 70 वयोगटातील 495 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे मुंबईत 50 ते 70 वयोगटातील रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे दिसत आहे.
मुंबईतील कोरोनाबाधितांचे आणि मृत्यूचे प्रमाण
दरम्यान सद्यस्थितीत मुंबईत 52 हजार 667 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील 23 हजार 694 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 18 हजार 440 म्हणजे जवळपास 70 टक्के लोकांना लक्षणे नाहीत. तर 26 टक्के म्हणजे 6 हजार 769 जणांना लक्षणं असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे.
तसेच मुंबईतील 916 रुग्णांची प्रकृती ही गंभीर आहे. मुंबईतील मृत्यूचा दर 3.3 टक्के असला तरी एकूण सक्रिय रुग्णांपैकी 4 टक्के रुग्ण गंभीर आहेत. (Mumbai Corona Patient Death Proportion)
…तर संपूर्ण नागपूर शहर कोविडच्या विळख्यात, तुकाराम मुंढेंकडून भीती व्यक्त https://t.co/tkvgJaMSi3 #Nagpur @Tukaram_IndIAS @gajananumate
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 11, 2020
संबंधित बातम्या :
Mumbai Corona | मुंबईत 798 कंटेन्मेंट झोन, साडेनऊ लाख घरे असलेले परिसर सील
Pune Corona | पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या पार