मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात आलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा वाढताना दिसत आहे. मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत 16 नोव्हेंबरला कोरोना रुग्णसंख्या ही 409 पर्यंत खाली आली होती. मात्र गेल्या पाच दिवसात त्यात दुप्पटीने वाढ झाली आहे. मुंबईत काल नव्या 1031 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Mumbai Corona Patient Increase in last Five days)
मुंबईत काल (शुक्रवारी) कोरोनाचे 1031 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 10 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये 9 पुरुष तर 4 महिला रुग्णांचा समावेश आहे. तर मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 73 हजार 480 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 637 वर पोहोचला आहे.
मुंबईमधून काल 553 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 50 हजार 456 वर गेला आहे. सध्या मुंबईत 9 हजार 046 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 296 दिवसांवर
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 296 दिवस तर सरासरी दर 0.23 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 382 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित सील करण्यात आल्या आहेत.
तसेच 3 हजार 967 इमारती आणि इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 17 लाख 39 हजार 865 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या
16 नोव्हेंबर – 409
17 नोव्हेंबर – 541
18 नोव्हेंबर – 871
19 नोव्हेंबर – 924
20 नोव्हेंबर – 1031
(Mumbai Corona Patient Increase in last Five days)
संबंधित बातम्या :
मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी उपाययोजना
मुंबई सावरली, दिल्लीत कोरोनाचा कहर का झाला?; सर्व्हेतून आली पाच कारणे!