मुंबई पुन्हा कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता, महिनाभरात तब्बल 45 हजार सक्रीय रुग्ण

त्यामुळे मुंबईची वाटचाल पुन्हा एकदा हॉटस्पॉटकडे होताना पाहायला मिळत आहे. (Mumbai Corona Patient)

मुंबई पुन्हा कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता, महिनाभरात तब्बल 45 हजार सक्रीय रुग्ण
मुंबई कोरोना
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 9:30 AM

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत कोरोनाच्या सक्रीय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात तब्बल 45 हजारांहून अधिक सक्रीय कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईची वाटचाल पुन्हा एकदा हॉटस्पॉटकडे होताना पाहायला मिळत आहे. (Mumbai Corona Patient Recorded more than 45 thousand active patients in the last month)

आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान

मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये गेल्या महिन्याभरात 45 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येसह सक्रीय रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या एका महिन्यात मुंबईतील एकूण अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 55 हजार 005 वर पोहोचली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाविरोधातील लढा आतापर्यंत सुरु आहे. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे डिसेंबर 2020 अखेरीस कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत होते. त्यानंतर मात्र नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोना रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहे.

मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

राज्यात कोरोना रुग्णांचा कहर पाहायला मिळत आहे. काल तब्बल 43 हजार 183 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दररोज 7 ते 8 हजार कोरोनाबाधित आढळत आहे. तसेच मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.  (Mumbai Corona Patient Recorded more than 45 thousand active patients in the last month)

गेल्या 1 मार्च 2021 मध्ये 9 हजार 690 कोरोनाचे सक्रीय रुग्ण होते. तर काल 1 एप्रिलला महिनाभरात ही संख्या तब्बल 55 हजार 005 वर पोहोचली आहे.  त्यामुळे वाढणारी रुग्णसंख्या ही मुंबईकरांच्या चिंता वाढवणारी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. तसेच मुंबईत ठिकठिकाणी आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील सक्रीय रुग्णांची सद्यस्थिती

  • 1 मार्च – 9690
  • 15 मार्च – 14582
  • 25 मार्च – 33961
  • 1 एप्रिल – 55005

मुंबईतील कोरोना स्थिती

मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 8 हजार 646 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 हजार 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात मुंबईत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 14 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 12 पुरुष तर 6 महिलांचा समावेश आहे. मुंबईत सध्या 55 हजार 5 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्क्यांवर पोहोचलाय. तर चिंताजनक बाब म्हणजे रुग्ण दुपटीचा कालावधी 49 दिवसांवर आला आहे. 25 मार्च ते 31 मार्च दरम्यानचा कोरोना वाढीचा दर पाहिला तर तो 1.38 टक्क्यांवर पोहोचला आहे. (Mumbai Corona Patient Recorded more than 45 thousand active patients in the last month)

संबंधित बातम्या : 

Corona Vaccine | महाराष्ट्रात एकाच दिवसात तब्बल तीन लाखांहून अधिक जणांना लस, मुंबई, पुण्यात किती जणांचे लसीकरण?

येत्या काही दिवसांत मुंबईत कडक निर्बंध लागणार, महापौरांचे मोठे संकेत

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.