मुंबई : एका कोरोना रुग्णाला तो जिवंत असतानाही कोरोना किटमध्ये गुंडाळून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन गेल्याचा दावा एका व्हिडीओतून करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना संबंधिताने मुंबई महापालिकेचाही उल्लेख केला आहे. या प्रकारावरुन आता मुंबई महापालिकेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा महापालिकेला बदनाम करण्याचा डाव आहे. महापालिका संबंधितावर गुन्हा दाखल करणार असल्याचं महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी म्हटलंय. (Mumbai Municipal Corporation will file a case against the controversial video of Corona patient)
वादग्रस्त व्हिडीओवरुन मुंबई महापालिकेनं खुलासा केलाय. मुंबई महापालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सुरेश नाखुआ यांना फोन करतोय पण ते फोन घेत नाहीत. आम्ही त्यांना ट्वीट केलेल्या व्हिडीओबद्दल विचारतो आहोत, मात्र ते प्रतिसाद देत नाहीत. आम्ही आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत आहोत, अशी माहिती चहल यांनी दिलीय.
एका जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला कोरोना किटमध्ये बांधून अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आलं. स्मशानभूमीत आणल्यानंतर तो रुग्ण जिवंत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. हा गंभीर आणि संतापजनक प्रकार मुंबईत घडल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत सुरेश नाखुआ यांनी एक ट्वीट केलंय. “हे धक्कादायक आहे. एक जिवंत माणूस बीएमसीने स्मशानभूमीत नेला. मला वाटतं की # महावसुली आघाडी सरकारचं स्मशानभूमीतून काही महावसुलीचं टार्गेट असेल,” असं सुरेश नाखुआ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
This is beyond shocking.
“A LIVING man taken to cremation centre by BMC.”
I think there might be some #MahaVasuliTarget from cremation centres by #MahaVasuliAghadi govt. pic.twitter.com/3FoWgPVrnQ
— Suresh Nakhua ( सुरेश नाखुआ ) (@SureshNakhua) April 20, 2021
नाखुआ यांनी हा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या ट्विटर हँडलवरुन त्याला उत्तर देण्यात आलंय. “सर, आपल्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानुसार आम्ही तुम्हाला विनंती केली की, या व्हिडीओचं मूळ आणि सत्यता तपासून पाहा. मात्र, तुम्हालाही या व्हिडीओचं मूळ स्थान आणि सत्यतेबद्दल खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही तुमच्याकडून माहितीची वाट पाहत आहोत. त्यानंतर याबाबत पुढील कारवाईचा विचार केला जाईल” असं ट्वीट मुंबई महापालिकेनं केलं आहे.
Sir,
as per our telephonic conversation with you,
we request you to please check and verify the origin of this video.Unfortunately,
you too weren’t sure of the location and veracity of this video, thus, we shall wait for details from you to decide the way forward https://t.co/xrxDld9EBt— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 20, 2021
मुंबई महापालिकेच्या या ट्वीटला नाखुआ यांनी उत्तर दिलंय. “कृपया दिशाभूल करु नका. आपलं दूरध्वनीवर संभाषण झालं नाही. तर ते फक्त व्हॉट्सअपवरील संदेशाची देवाणघेवाण होती. मला या घटनेत्या स्थानाबाबत माहीत नाही. मी त्याबाबत माहिती घेत असल्याचं तुम्हाला सांगितलं. लोकांची दिशाभूल करु नये, अशी विनंती”, असं नाखुआ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
Dear @mybmc, pls don’t mislead.
1) It was not a *telephonic conversation*. It was just exchange of couple of Whatsapp messages.
2) Nowhere, I said I wasn’t sure of the location. I just said “I will update”.
Request you to NOT to mislead people. https://t.co/Jgtpigz5d2
— Suresh Nakhua ( सुरेश नाखुआ ) (@SureshNakhua) April 20, 2021
ही धक्कादायक बाब उघडकीस आणणारे सुरेश नाखुआ कोण आहेत? हे तपासल्यानंतर ते मुंबई भाजपचे प्रवक्ते असल्याचं समजतंय. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर तशी माहिती दिली आहे. त्यांचं ट्विटर अकाऊंटही व्हेरिफाईड आहे. दरम्यान, सुरेश नाखुआ यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही.
संबंधित बातम्या :
Mumbai Local update : मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद, कडक लॉकडाऊनमध्ये काय सुरु काय बंद?
Mumbai Municipal Corporation will file a case against the controversial video of Corona patient