Mumbai Corona Update : मुंबईने कोरोना रुग्णसंख्येत 10 हजाराचा टप्पा ओलांडला, दिवसभरात 31 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 10 हजार 30 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Mumbai Corona Update : मुंबईने कोरोना रुग्णसंख्येत 10 हजाराचा टप्पा ओलांडला, दिवसभरात 31 जणांचा मृत्यू
कोरोना चाचणी प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 8:09 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय. गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 10 हजार 30 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना स्थिती अतिशय विदारक बनत असल्याचं चित्र या आकडेवारीतून पाहायला मिळत आहे. (Mumbai Today, more than 10,000 corona patients and 31 people died)

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर

मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येनं 10 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर 7 हजार 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 77 हजार 495 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आज दिवसभरात 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 19 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये 20 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. अजून एक चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर येऊन ठेपलाय. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.79 टक्के झाला आहे.

मुंबई महापालिकेची नवी नियमावली

मुंबई महापालिकेने चौपाट्या, ॲन्टिजेन टेस्टींग, मायक्रो कंटेंटमेंट झोन, आणि कोविड टेस्टींगबाबत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये चौपाट्या आणि समुद्रकिनारे 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. खाजगी दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये येणा-या लक्षणे नसणा-या रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी करता येणार नाही लक्षणे असलेल्या रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी करुन त्याचा रिपोर्ट आयसीएमआर गाईडलाईनप्रमाणे प्रशासनास कळवावा लागेल. लक्षणे असलेला रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास आणि हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध असल्यास तेथेच ॲडमिट होईल आणि बेड नसल्यास वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून नजीकच्या केंद्रात त्याला दाखल केले जाईल.

मायक्रो कंटेंटमेंट झोन आणि सोसायट्यांना तगडा दंड

5 किंवा 5 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या मुंबईतील इमारती आता मायक्रो कंटेंटमेंट झोन म्हणून ओळखल्या जातील. अशा इमारतीबाहेर मायक्रो कंटेंटमेंट झोनचा बोर्ड लावाला जाईल. मायक्रो कंटेंटमेंट झोनमधील सर्व निर्बंध आणि नियम पाळले जाण्याची जबाबदारी सोसायटीवर राहील. नियम मोडल्यास पहिल्या खेपेस सोसायटीस 10 हजार आणि वारंवार नंतर प्रत्येकवेळी जेव्हा जेव्हा नियम मोडले जातील तेव्हा 20 हजार दंड आकारला जाईल. मायक्रो कंटेंटमेंट झोनच्या इमारतीसमोर एक पोलीस कर्मचारी नेमला जाईल.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update : ‘कठोर निर्बंधांमधून छोटे व्यावसायिक, सामान्यांना दिलासा द्या’, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Corona Vaccination : केंद्राकडून महाराष्ट्राचं कौतुक, राज्यात आतापर्यंत 81 लाखापेक्षा अधिक व्यक्तींना लसीचा पहिला डोस

Mumbai Today, more than 10,000 corona patients and 31 people died

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.