मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कोरोना लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी कोरोना लसीचा साठा मर्यादित स्वरुपात उपलब्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आज (25 एप्रिल) सुरु असलेल्या कोव्हिड लसीकरण केंद्रांची नावे जाहीर केली आहेत. (Mumbai Corona vaccination centers will be functional today)
मुंबईत ठिकठिकाणी कोरोना लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र अनेक केंद्रात कोरोनाची लसीचा साठा संपला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच आज रविवार असल्याने मुंबईतील बऱ्याच केंद्रात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय टाळावी या हेतूने पालिकेकडून आज सुरु असलेल्या कोव्हिड केंद्रांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. यानुसार मुंबईत आज 30 सार्वजनिक तर 7 खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या ठिकाणी कोविड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
दरम्यान मुंबईत सद्यस्थितीत 59 सार्वजनिक तर 73 खासगी लसीकरण केंद्र आहेत. मात्र कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात असल्या कारणामुळे काही ठराविक केंद्रांवर लस दिली जात आहे. आज पालिकेच्या किंवा खासगी लसीकरण केंद्रात लससाठा उपलब्ध असेपर्यंत लसीकरण करण्यात येईल. या लसीकरण केंद्रांवर दुसऱ्या डोसचे लाभार्थी आणि प्रथम येणाऱ्या लाभार्थीस प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लस देण्यात येईल, अशी सूचना महापालिका प्रशासनाने दिली आहे.
(अनुक्रम, प्रशासकीय विभाग, सार्वजनिक रूग्णालयाचे नाव या क्रमाने)
1. ई: जे. जे. रूग्णालय, भायखळा
2. ई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रूग्णालय, भायखळा
3. ई: कस्तुरबा रूग्णालय, चिंचपोकळी
4.. एफ/दक्षिण: केईएम रूग्णालय, परळ
5. एफ/दक्षिण: टाटा मेमोरियल रुग्णालय, परळ
6. एफ/उत्तर: मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा
7. एफ/उत्तर : अकवर्थ रुग्णालय, वडाळा
8. जी/दक्षिण: वरळी कोळीवाडा आरोग्य केंद्र, वरळी
9. जी/ दक्षिण: ईएसआयएस रुग्णालय, वरळी
10. एच/पूर्व : व्ही.एन.देसाई रूग्णालय, सांताक्रूझ
11. एच/पश्चिम: भाभा रूग्णालय, वांद्रे
12. के/पूर्व: शिरोडकर प्रसुतीगृह, विलेपार्ले
13. के/पूर्व: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय, जोगेश्वरी
14. के/ पश्चिम: कुपर रूग्णालय, जुहू
15. पी/ दक्षिण: टोपीवाला दवाखाना,गोरेगाव
16. पी/ दक्षिण: गोकूळधाम प्रसृतिगृह, गोरेगाव
17. पी/ दक्षिण: मीनाताई ठाकरे रक्तपेढी कोविड लसीकरण केंद्र, गोरेगाव
18. पी/ उत्तर: स.का. पाटील रूग्णालय, मालाड
19. पी/उत्तर: मालवणी सरकारी रूग्णालय, मालाड
20. पी/उत्तर: चौकसी प्रसुतिगृह, मालाड
21. पी/उत्तर: आप्पापाडा प्रसुतिगृह, मालाड
22. आर/ दक्षिण: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कांदिवली
23. आर/ दक्षिण: चारकोप विभाग १ दवाखाना, कांदिवली
24. आर/ दक्षिण: आकुर्ली प्रसूतिगृह, कांदिवली
25. आर/ दक्षिण: इएसआयएस रूग्णालय, कांदिवली
26. आर/ मध्य: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रूग्णालय, बोरिवली
27. एम/ पूर्व: शताब्दी रूग्णालय, गोवंडी
28. एम/ पश्चिम : माँ रूग्णालय, चेंबुर
29. एस: लालबहादूर शास्त्री प्रसुतिगृह, भांडूप
30. एस: क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले जनरल रुग्णालय, विक्रोळी
(Mumbai Corona vaccination centers will be functional today)
?खासगी रूग्णालयातील कार्यरत कोविड लसीकरण केंद्र 😕
1. सी: मित्तल रुग्णालय, चर्नी रोड
2. के/पूर्व: क्रिटीकेअर रुग्णालय, अंधेरी
3. पी/उत्तर: तुंगा रुग्णालय, मालाड
4. पी/उत्तर: लाईफ लाईन मल्टीस्पेशलिस्ट रुग्णालय, मालाड
5 .आर/दक्षिण: शिवम रूग्णालय, कांदिवली
6. एल विभाग: कोहिनूर रुग्णालय, कुर्ला
7. एम/पश्चिम: ईनलॅक्स् रुग्णालय, चेंबूर
List of vaccination centres that will be functional on 25 April, 2021.
Owing to limited supply of vaccines, CVCs will either be functional in the first half or till stocks last with preference to beneficiaries coming in for their second dose.#JabToBeatCorona pic.twitter.com/fylVWGRboq
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 24, 2021
(Mumbai Corona vaccination centers will be functional today)
संबंधित बातम्या :
कशी होणार ऑक्सिजन निर्मिती?; कसा असेल मुंबई महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट?; वाचा सविस्तर
मुंबई महापालिका आता घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करणार; 10 जणांचं पथक, 10 रुग्णवाहिका सज्ज