वांद्रे पूर्वेतील लसीकरण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात डावललं, काँग्रेस आमदार नाराज

वांद्रे पूर्वमधील लसीकरण केंद्राचं उद्घाटन परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. पण या कार्यक्रमात डाववल्यामुळे काँग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वांद्रे पूर्वेतील लसीकरण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात डावललं, काँग्रेस आमदार नाराज
वांद्रेतील कोरोना लसीकरण केंद्राचं अनिल परबांच्या हस्ते उद्घाटन, झिशान सिद्दीकी नाराज
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 3:51 PM

मुंबई : मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून कडक लॉकडाऊन, कठोर निर्बंधांसह नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यासाठी मुंबईत 3 नवीन लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी गुरुवारी दिली. त्यानंतर वांद्रे पूर्वमधील लसीकरण केंद्राचं उद्घाटन परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. पण या कार्यक्रमात डाववल्यामुळे काँग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Congress MLA Zeeshan Siddiqui unhappy  on inauguration of new corona vaccination center in Bandra East)

काल माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात कोरोना लसीकरण केंद्राचं उद्घाटन शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. स्थानिक आमदार या नात्याने प्रोटोकॉलनुसार या उद्घाटनाला मला का बोलावण्यातं आलं नाही? आपणही लसीकरणाबाबत राजकारण करणार आहात का? असा सवाल आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्वीट करत शिवसेनेला विचारला आहे.

मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी नवे लसीकरण केंद्र

मुंबईतील लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांना लस न घेताच परतावं लागत आहे. त्यामुळे मोठी नाराजी व्यक्त होत आहे. अशावेळी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत नवे लसीकरण केंद्र सुरु करण्यााबाबत आपण महापालिका आयुक्तांशी बोललो आहोत. लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं पर्यावरणमंत्री आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर लगेच मुंबईत तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वांद्रे पूर्व इथल्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरुन काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

मुंबईत 3 नवे लसीकरण केंद्र

मुंबईत कोरोना लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. नागरिकांची हेळसांड थांबवण्यासाठी मुंबईमध्ये 3 नवे लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. त्यात,

1. माँसाहेब मिनाताई ठाकरे मॅटर्निटी होम, चुनाभट्टी 2. PWD कम्युनिटी हॉल, वांद्रे 3. MCMG पार्किंग, वर्ल्ड टॉवर, लोअर परळ

संबंधित बातम्या : 

मुंबईकरांनो लक्ष द्या, ‘कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’नुसारच लसीकरण

Corona Vaccine : लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंची महापालिका आयुक्तांशी चर्चा

Congress MLA Zeeshan Siddiqui unhappy  on inauguration of new corona vaccination center in Bandra East

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.