Mumbai Coronavirus: लॉकडाऊन कठोर करण्याच्या हालचाली सुरु; दादर स्टेशनवरील भाजी मार्केट हलवणार

कडक निर्बंध लादूनही लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. | Mumbai Coronavirus

Mumbai Coronavirus: लॉकडाऊन कठोर करण्याच्या हालचाली सुरु; दादर स्टेशनवरील भाजी मार्केट हलवणार
गेल्यावर्षी दादर परिसराचा समावेश असलेला जी-साऊथ वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता.
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 2:13 PM

मुंबई: मर्यादित स्वरुपाचा लॉकडाऊन आणि वारंवार सूचना देऊनही मुंबईच्या दादर परिसरातील भाजी मार्केटमध्ये नागरिक रोज गर्दी करत असल्याने आता हे मार्केट स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईतील भाजी मार्केटस तात्पुरती खुल्या मैदानात हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कडक निर्बंध लादूनही लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Dadar vegetable market will be shifted in open ground)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मुंबईतील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आल्याचे सांगितले. मुंबईतील 35 लसीकरण केंद्रे सध्या बंद पडली आहेत. तसेच रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत विरोधक राजकारण करत आहेत. त्यांना खुर्चीत बसून नुसतं बोलायला काय जातं, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

गेल्या काही दिवसांत वारंवार सांगूनही लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर अशा सर्वच शहरांमध्ये भाजी मार्केटमध्ये सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दी होते. गेल्यावर्षी दादर परिसराचा समावेश असलेला जी-साऊथ वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. तशी परिस्थिती पुन्हा ओढावू नये म्हणून आता पालिकेकडून दादर मार्केट स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात आणखी कठोर लॉकडाऊन अटळ, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा?

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात आणखी कडक निर्बंध (New Lockdown curbs) लादण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपले मत कळवले आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी दुपारी 3.30 वाजता होणाऱ्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra govt may imposed new and strict lockdown curbs soon)

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी राज्यात सध्या नियमावलीत बदल करून अजून कडक नियम करण्याची गरज व्यक्त केली. सध्या अनेक लोकांचा अत्याआवश्यक सेवेत समावेश करण्यात आले आहे. ती संख्या कमी करावी असे मत अजित पवार यांनी मांडल्याचे समजते.

किराणा दुकानांची नवी वेळ आज ठरणार

राज्यात कठोर निर्बंध लागू करुनही कोरोनाच्या प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे आता ठाकरे सरकार (Thackeray govt) अत्यावश्यक सेवांच्या यादीत असलेल्या किराणा दुकाने सुरु ठेवण्याची वेळही कमी करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्यातील व्यापाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (Thackeray govt cabinet meet today may take decision about shops and strict lockdown)

संभाव्य निर्णयानुसार किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच खुली राहणार आहेत. या निर्णयाला व्यापाऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. सरकारला विनंती आहे की, अत्यावश्यक सेवेतील दुकानाची वेळ कमी केली तर एकाच वेळी मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या अधिकच वाढेल, असा युक्तिवाद व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केला आहे. संबंधित बातम्या: 

Maharashtra Lockdown: मला लोकांना घाबरवयाचं नाही, पण इंग्लंडमधला दुसरा लॉकडाऊन 92 दिवस लांबला होता: डॉ. संजय ओक

किराणा दुकानांची नवी वेळ आज ठरणार; लॉकडाऊन आणखी कठोर होणार?; ठाकरे सरकारच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष

Tanmay Fadnavis | ‘चाचा विधायक है हमारे’ लशीवरुन टीकेची झोड उठलेला फडणवीसांचा पुतण्या तन्मय आहे कोण?

(Dadar vegetable market will be shifted in open ground)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.