Coronavirus In Mumbai: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के

मंगळवारी नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी राहिली. | Mumbai Coronavirus

Coronavirus In Mumbai: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के
कोरोना व्हायरस
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 8:39 AM

मुंबई: काही दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस वेगाने सुधारत आहे. नुकताच मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 400 दिवसांपेक्षा जास्त झाला होता. त्यानंतर आता मुंबईत कोरोना (Coronavirus) रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. पालिकेने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील कोरोनाचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहचला आहे. (Coronavirus situation in Mumbai city)

मंगळवारी नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी राहिली. दिवसभरात 831 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 5 हजार 868 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 17 हजार 328 इतकी खाली आली आहे.

राज्यात काल 14,123 नवीन रुग्णांचे निदान

राज्यात मंगळवारी 14,123 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 477 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 14,123 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 2,30,681 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,61,015 झालीय.

मुंबईत कोरोनाचा डबलिंग रेट वाढला, मृत्यूही घटले

राज्यात कोरोनाची दुसरी लाट पीक पॉईंटला असताना मुंबईत दिवसाला 11 हजारापर्यंत रुग्ण सापडत होते. मात्र, आता शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. विशेषत: मे महिन्यातील उत्तरार्धात परिस्थिती वेगाने सुधारताना दिसत आहे. कारण, 20 दिवसांत रुग्ण दुपटीचा कालावधी 163 दिवसांवरुन 370 दिवसांपर्यंत जाऊन पोहोचला होता.

संबंधित बातम्या:

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला, आज 831 रुग्ण सापडले

मुंबई शहराने कोरोनाला कसं रोखलं? इक्बाल सिंह चहल यांचा राज्यातील महापालिका आयुक्तांशी संवाद

मुंबईत आता अत्यावश्यक सेवेतली दुकाने आठवडाभर ओपन राहणार, इतर नियम काय?

(Coronavirus situation in Mumbai city)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....