भयंकर…! कुत्र्यासोबत केले अनैसर्गिक कृत्य: आरोपी चकवा देऊन पळून गेला…
महिलेने आरडोओरड केल्यानंतर या प्रकरणातील युवक पळून गेला. या प्रकारामुळे महिलेने नजीकच्या आंबोली पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : माणूस कधी उच्च पातळीवर जाईल आणि कधी अगदी नीच पातळीवर जाईल सांगता येणार नाही.असेच एक धक्कादायक उदाहरण मुंबईत घडले आहे. रस्त्यावर भटक्या कुत्र्यासोबत एका विकृत व्यक्तीने अनैसर्गिक कृत्य केले आहे.हा लाजिरवाणी प्रकार मुंबईतील अंधेरीच्या आंबोली परिसरात घडला आहे. याप्रकरणी मिथिलेश दास या नावाच्या 45 वर्षाच्या आरोपली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध आंबोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 एप्रिल रोजी सायंकाळी घडली होती.
या घटनेची माहिती एका 25 वर्षीय महिलेने पोलिसांना दिली असल्याचे त्या महिलेने सांगितले आहे. मिथिलेश दास याने एका कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे त्या महिलेने सांगितले.
महिलेने त्याला आवाज देऊन तेथून हाकलून लावण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र त्या गोष्टीचा आरोपींवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे या महिलेने जवळच असलेल्या पोलिसात त्या व्यक्तीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
त्या महिलेच्या तक्रारीची दखल घेत अंधेरीच्या अंबोली पोलिसांनी विद्रूप झालेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र त्याचवेळी आरोपीनीही तिथून पळ काढला होता.
त्यानंतर मात्र पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेत असताना पोलिसांनी आरोपीच्या घरातूनच त्याला ताब्यात घेतले.
हे संपूर्ण प्रकरण 3 एप्रिल रोजी मुंबईतील अंधेरी भागातील आंबोली पोलीस स्टेशनजवळन घडले. त्यावेळी 25 वर्षीय महिलेला रस्त्याच्या कडेला एका कोपऱ्यातून कुत्र्याचा आवाज आला.
त्यावेळी महिलेने त्या आवाजाच्या दिशेने घरात पाहिले असता या तरुणाने कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे आढळून आले आहे.
त्यावेळी महिलेने आरडोओरड केल्यानंतर या प्रकरणातील युवक पळून गेला. या प्रकारामुळे महिलेने नजीकच्या आंबोली पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.