मुंबई : राज्य सरकारने ‘अनलॉक 5′ साठी महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत (Dabawala Get Permission To Travel By Local). त्यामध्ये मुंबईच्या डबेवाल्यांना अखेर लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांना दिलासा मिळाला आहे (Dabawala Get Permission To Travel By Local).
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, लॉकल सेवा बंद होत्या. मात्र, अनलॉकच्या दिशेने पावले टाकत असताना आता 5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. त्याशिवाय, मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, लोकलमधून प्रवास करण्यासाठी डबेवाल्यांना मुंबई पोलिसांनी दिलेला क्युआर कोड असणे बंधनकारक असणार आहे. तरच एमएमआरमध्ये लोकलमध्ये डबेवाल्यांना प्रवेश मिळणार आहे.
“आम्ही राज्य सरकारचे आभार मानतो. आम्ही सर्व सोशल डिस्टन्सच्या नियमांचं पालन करुन प्रवास करु. डबेवाला आता पुन्हा कामावर रुजू होणार आहे. त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली (Dabawala Get Permission To Travel By Local).
अनलॉक 5 मध्ये काय सुरु?
अनलॉक 5 मध्ये काय बंद?
Unlock 5 Guidelines : राज्यात 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरु, थिएटर्स, शाळा बंद https://t.co/A0XZOWzygZ@OfficeofUT @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra #Unlock5 #unlock5guidelines
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 30, 2020
Dabawala Get Permission To Travel By Local
संबंधित बातम्या :