अभ्यासक्रमात आपल्या मुंबईतील डब्बेवाल्या काकांचा धडा; पाठ्यपुस्तकात असेल खास ‘पाठ’

Mumbai Dabbawalla : घराचे जेवण थेट कार्यालयात पोहचविण्याचे व्यवस्थापन मुंबईतील डब्बेवाले अविरतपणे करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल जगातील अनेक दिग्गजांनी घेतली आहे. इंग्लंडचा राजकुमार असो की काही देशांचे राष्ट्राध्यक्ष अनेक जण डब्बेवाल्यांमुळे प्रभावित झाले आहेत. आता त्यांचा धडा अभ्यासक्रमात आला आहे.

अभ्यासक्रमात आपल्या मुंबईतील डब्बेवाल्या काकांचा धडा; पाठ्यपुस्तकात असेल खास 'पाठ'
डब्बावाल्या काकांचा आता अभ्यासक्रमात धडा
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 11:29 AM

मुंबईतील जग प्रसिद्ध डब्बावाल्या काकांच्या यशाचे आणि व्यवस्थापनाचे धडे आता अभ्यासक्रमात गिरवले जातील. मुंबईतील डब्बावाल्यांचा व्यवसाय जवळपास 130 वर्षांहून अधिक जुना आहे. घराचे जेवण थेट कार्यालयात पोहचविण्याचे व्यवस्थापन मुंबईतील डब्बेवाले अविरतपणे करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल जगातील अनेक दिग्गजांनी घेतली आहे. इंग्लंडचा राजकुमार असो की काही देशांचे राष्ट्राध्यक्ष अनेक जण डब्बेवाल्यांमुळे प्रभावित झाले आहेत. आता त्यांचा धडा अभ्यासक्रमात आला आहे. इयत्ता 9 वीच्या अभ्यासक्रमात डब्बावाल्यांचा धडा असेल.

केरळ सरकारचा मोठा निर्णय

केरळच्या इयत्ता 9 वीतील इंग्रजीच्या पुस्तकात द सागा ऑफ द टिफिन कॅरियर्स या नावाने हा पाठ असेल. या धड्याचे लेखक ह्युग आणि कोलीन गँटजर आहेत. केरळ राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) 2024 साठी आताच्या अद्ययावत अभ्यासक्रमात डब्बेवाल्याच्या कथेचा समावेश आहे. या धड्यात डब्बेवाल्यांची सुरुवात कशी झाली. त्यांचे व्यवस्थापन याची माहिती देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

130 वर्षांहून अधिकची सेवा

मुंबईत डब्बे पोहचवण्याचा हा व्यवसाय जवळपास 130 वर्षांहून अधिक जुना आहे. डब्बेवाले घरातून गरमागरम डब्बा मुंबईकरांना त्यांच्या कार्यालयात नेऊन पोहचवतात. त्यामुळे चाकरमान्यांची खाण्याची अबाळ होत नाही. त्यांना घराच्या जेवणाची लज्जत चाखता येते. या डिलिव्हरी सिस्टमची जगभरात ख्याती पसरली आहे. इंग्लंडचा राजा, अनेक देशाचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांनी पण या कामाचे तोंडभरून कौतुक केले आहे. मुंबईत सायकलवर एकाचवेळी अनेक डब्बे दिसतात. सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना घरगुती जेवणाचा आनंद त्यांच्यामुळे मिळतो. विशेष म्हणजे या पद्धतीत डब्बा बदलल्याची तक्रार समोर येत नाही. त्यांचा व्यवस्थापनाची ही एक खास बाब आहे.

रोज 2 लाख मुंबईकरांना पोहचतो डब्बा

मुंबईतील डब्बावाला संघटनेशी जवळपास 5 हजारांहून अधिक जण जोडल्या गेले आहेत. ते जवळपास 2 लाखांहून अधिक जणांना डब्बा पोहचवण्याचे काम करतात. महादु हावजी बचे यांनी 1890 मध्ये या डब्बे पोहचविण्याची सेवा सुरू केली होती. सुरूवातीला हे सेवा केवळ 100 ग्राहकांपर्यंत मर्यादीत होती. पण जस जसं शहरं वाढलं. डब्बा वितरणाची प्रणाली व्यापक झाली.

डब्बेवाल्यांचा खास पोशाख आहे. पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा, डोक्यावर गांधी टोपी आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ, पायात कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा पेहराव असतो. जगातील अनेक मोठं-मोठ्या बिझनेस स्कूलने त्यांच्यावर संशोधन केले आहे. त्यांच्यावर डॉक्युमेंट्रीज, पुस्तकं आणि कॉमिक बुक पण काढण्यात आले आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.