जमलेल्या माझ्या तमाम…;शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा?, ठाकरे की शिंदे?

Dadar Shivaji Park Dasara Melava : यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार? याची राजकीय वर्तुळासह शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे. शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाने अर्ज केला आहे. आता महापालिका कुणाला परवानगी देणार? हे पाहावं लागेल. वाचा सविस्तर....

जमलेल्या माझ्या तमाम...;शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा?, ठाकरे की शिंदे?
दसरा मेळावाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 10:44 AM

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती शिवाजी पार्क मैदानावरची प्रचंड सभा… शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य सभा याच शिवाजी पार्क मैदानावर होत असत. पण 2022 ला शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या सभेच्या जागेवरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी परवानगी मागण्यात आली. यंदा या शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे. यंदा या मैदानावर कुणाची सभा होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

ठाकरे गटाकडून सभेच्या परवानगीसाठी अर्ज

शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी मुंबई महापालिकेला अर्ज करण्यात आला आहे. या अर्जासोबतच मागील आठ महिन्यात तीन स्मरणपत्र देखील देण्यात आली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत अर्ज केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर दसरा मेळाव्याच्या सभेसाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्कची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला सभेसाठी परवानगी दिली होती.

शिंदे गटाकडून अद्याप अर्ज नाही

दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये, यासाठी काही महिन्याआधीच शिवसेना ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखांकडून अर्ज आणि स्मरणपत्र महापालिकेला देण्यात आली आहेत. गणेशोत्सवानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या या अर्जासंदर्भात मुंबई महापालिका निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. 18 सप्टेंबरनंतर मुंबई महापालिका परवानगी संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन संबंधित अर्जदाराला याबाबत कळवणार आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मेळावा यासाठी अद्याप अर्ज केली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी अर्ज करणार का? याची प्रतीक्षा आहे.

'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली.
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च.
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?.
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा.
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन.
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.