राष्ट्रवादीची सूत्र नेमकी कुणाकडे; अजित पवार काय म्हणाले?
DCM Ajit Pawar on NCP Leadership : राष्ट्रवादीची सूत्र कुणाकडे? येत्या काळात राष्ट्रवादी पक्षाची सूत्रं कुणाकडे असतील? यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार काय म्हणाले? राजकीय समिकरणांवर अजित पवारांनी काय भाष्य केलं? वाचा...
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची सूत्र नेमकी कुणाकडे असतील? याची राज्यासह देशाच्या राजकारणात चर्चा होते. यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत अजित पवार यांनी यावर स्पष्ट भाष्य केलं. येत्या चार-पाच वर्षात याचं उत्तर मिळेल, असं अजित पवार म्हणाले. चार पाच वर्ष महाराष्ट्रातील जनतेला कळेल. चार पाच वर्षात. कुणाकडे सुत्रे राहतील. त्यात विशेष काय. ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलं नाही. जनता ज्याच्या पाठी त्याला संधी मिळेल. ठरावीक काळ झाल्यावर थांबलं पाहिजे. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात तुम्ही कधी तरी थांबतना . वकील, खेळाडू, डॉक्टरही थांबतात. पण कुणी कुठे थांबावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्ही त्यावर बोलू शकत नाही, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार ट्रॅपमध्ये फसले का?
कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही कुणाच्या ट्रॅपमध्ये फसलो नाही. अजित पवार कुणाच्या ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही. माझं रोखठोक काम असतं. असलं लेचंपेचं काम माझ्याकडे नाही. राजकीय जीवनात वाटलं तेव्हा राजीनामा टाकला आणि निघून गेलो. जे काही चित्र रंगवलं जातं, सांगितलं जातं ते धांदात खोटं आहे. त्यात तसूभर, नखाच्या एवढंही सत्य नाही, असं अजित पवार म्हणाले.
बारामतीच्या लढतीवर अजित पवार म्हणाले…
बारामतीतील लढतीवर अजित पवार यांनी भाष्य केलं. दोघांची राजकीय कारकिर्द पणाला लागली का? यावर अजित पवार बोलले. निवडणूक म्हटल्यावर यश अपयश असतं. आमच्या घरात आजच झालेलं नाही. फार पूर्वी वसंतदादा पवार हे आमचे थोरले काका… आमचं अख्खं घराणं शेतकरी कामगार पक्षाचं होतं नवीन पिढीला माहीत नाही. नवीन बारामतीकरांना माहीत नाही. जुन्या बारामतीकरांना माहीत आहे. तेव्हा एकटे पवार साहेब काँग्रेससाठी काम करत होते. अख्खं घराणं आजी आजोबा, सर्व त्यांची मुली, मुलं सर्व मेंबर हे शेतकरी कामगार पक्षाचं काम करत होते. ही इतिहासाची नोंद आहे. १९६२चा काळ होता, असं अजित पवार म्हणाले.