Deepak Kesarkar Meets Sharad Pawar : मंत्री दीपक केसरकर शरद पवारांच्या भेटीला; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Deepak Kesarkar Meets NCP Leader Sharad Pawar : मंत्री दीपक केसरकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो समोर आला आहे. दीपक केसरकर आणि शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीदरम्यान कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? याचीही राजकीय वर्तूळात चर्चा होेतेय.

Deepak Kesarkar Meets Sharad Pawar : मंत्री दीपक केसरकर शरद पवारांच्या भेटीला; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 4:44 PM

मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. अशातच शिवसेनेचे नेते, कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. सकाळी 10 वाजता दीपक केसरकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांना सदिच्छा दिल्या. तसंच केसरकर यांनी शरद पवार यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली. ही सदिच्छा भेट असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा?

शरद पवार आणि दीपक केसरकर यांच्या भेटीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. शालेय आणि माध्यमिक शिक्षण पद्धतीमध्ये होत असलेल्या बदलांवर शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचं दीपक केसरकर म्हणालेत. शिवाय शिक्षण क्षेत्रातील अपेक्षित सुधारणा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या निवारण कशा करता येतील, अशा विविध विषयांवर चर्चा केल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.

दीपक केसरकर यांनी या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. शरद पवार यांची आज सदिच्छा भेट घेतल्याच या ट्विटमध्ये केसरकर म्हणाले आहेत. या दोघांमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाज ठाम आहे. 40 दिवसांच्या मुदतीनंतरही निर्णय न झाल्याने मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषण करत आहेत. राज्यभर आंदोलनं होत आहेत. मोर्चे काढले जात आहेत. उपोषणं केली जात आहेत. मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशातच आता शरद पवार आणि दीपक केसरकर यांच्या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं असेल.

राजकीय वर्तुळात सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी काय केलं? असा सवाल मोदींनी विचारला. त्यानंतर युतीमधील मंत्र्याने शरद पवार यांची भेट घेणं, याला वेगळं महत्व आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.