धारावीतील घरात अजगराची एन्ट्री, जांबाज पोलिस शिपायाकडून थरारक सुटका

धारावी पोलीस ठाणे हद्दीत वाय जंक्शन येथे राहणाऱ्या रहिवाशाच्या घरात 31 डिसेंबरच्या रात्री अजगर शिरला होता.

धारावीतील घरात अजगराची एन्ट्री, जांबाज पोलिस शिपायाकडून थरारक सुटका
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 10:06 AM

मुंबई : जगाच्या कानाकोपऱ्यात थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन सुरु होतं. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा लौकिक असलेल्या धारावीतही नवीन वर्षाचं जंगी स्वागत करण्यात येत होतं. अशातच धारावीतील एका घरात अचानक अजगर शिरला आणि एकच तारांबळ उडाली. (Mumbai Dharavi Ajgar Python rescue by Mumbai Police Muralidhar Jadhav)

जुन्या वर्षाला गुडबाय करत नववर्षाचा जल्लोष सुरु असताना धारावीत अचानक एका घरात अजगर शिरल्याची घटना घडली. अजगर आल्याचं वृत्त धारावीच्या गल्लीबोळातून वाऱ्यासारखं पसरलं. त्यामुळे अजगराला पाहण्यासाठी स्थानिक रहिवाशांची तोबा गर्दी झाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला.

कुठे सापडला अजगर?

धारावी पोलीस ठाणे हद्दीत वाय जंक्शन येथे राहणाऱ्या रहिवाशाच्या घरात अजगर शिरला होता. पहिल्या मजल्यावर असलेल्या घराच्या कौलात हा सहा फूट लांबीचा अजगर शिरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

अजगर आल्याचं समजताच मुंबई पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दलात काम करणाऱ्या मुरलीधर जाधव या शिपायाने जीवाची बाजी लावत अजगराची सुटका केली. मुरलीधर जाधवांनी अगदी सहजरित्या अजगराला घरातून बाहेर काढलं आणि त्याची सुरक्षित सुटका केली. मुरलीधर जाधव यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे पोलीस दलात कौतुक होत आहे.

अजगर घरात शिरल्यामुळे रात्रीच्या वेळी धारावीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अजगराला पकडताच उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. ‘मुंबई पोलीस जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अजगराचे फोटो-व्हिडीओ, मुरलीधर जाधवांना शेकहँड करण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली. मात्र पोलिसांना गर्दीला पांगवलं.

वांद्र्यात 24 तासात सापडले होते दोन अजगर

गेल्या वर्षी मुंबईतील वांद्रे परिसरात दोन अजगर सापडल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. अवघ्या 24 तासाच्या आत या परिसरात तब्बल 8 फुटाचे दोन अजगर सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सकाळी वांद्रे पूर्व परिसरात 7.5 फूट लांबीची अजगराची मादी सापडली होती. तर रात्री वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पुलावर दुसरा अजगर आढळून आला होता.

वांद्र्यातील रस्त्यावर या प्रकारे साप येण्याची ही पहिलीच घटना नव्हती, याआधीही अशा घटना घडल्या आहेत. अशाप्रकारे साप रस्त्यावर येण्याचं कारण वाढतं काँक्रीटीकरण आणि मेट्रोचे काम करण्यासाठी केलेलं खोदकाम असल्याचं सांगितलं जातं. मोठ्यामोठ्या मशिन्सचे हादरे बसल्याने साप आपल्या बिळातून बाहेर येत असल्याचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या : 

मुंबईतील वांद्रे परिसरात 24 तासात दोन अजगर सापडले!

(Mumbai Dharavi Ajgar Python rescue by Mumbai Police Muralidhar Jadhav)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.