कोरोनाचा वाढता कहर, धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट, कोणत्या परिसरात किती रुग्ण?
मुंबईत वरळी कोळीवाड्यानंतर आता धारावी कारोनाचे हॉटस्पॉट ठरू (Mumbai Dharavi Corona Patient) लागले आहे.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा (Mumbai Dharavi Corona Patient) दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईत आज 77 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ही 2 हजारच्या पार पोहोचली आहे.
मुंबईत वरळी कोळीवाड्यानंतर आता धारावी कारोनाचे हॉटस्पॉट ठरू (Mumbai Dharavi Corona Patient) लागले आहे. धारावीत परिसरात आज नव्या 15 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे धारावी परिसरात 100 पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहे. तर आज धारावीतील 62 वर्षीय एका रुग्णाचा कोरोनाबळी गेला आहे.
77 new COVID19 positive cases, 5 deaths reported in Mumbai today; the total number of positive cases in Mumbai is 2120 including 121 deaths: Municipal Corporation Greater Mumbai
— ANI (@ANI) April 17, 2020
धारावी परिसरात 10 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर मुंबईत आतापर्यंत 121 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 हजार 120 वर पोहोचला आहे.
हेही वाचा – मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची वॉर्डनिहाय आकडेवारी
धारावीत कुठे किती रुग्ण?
परिसर – एकूण रुग्ण
- डॉ. बालिगा नगर – 5 (3 मृत्यू)
- वैभव अपार्टमेंट – 2
- मुकूंद नगर – 17
- मदिना नगर – 2
- धनवाडा चाळ – 1
- मुस्लिम नगर – 21 (1 मृत्यू)
- सोशल नगर – 10 (1 मृत्यू)
- जनता सोसायटी – 9
- कल्याणवाडी – 4 (2 मृत्यू)
- PMGP कॉलनी – 1
- मुरगन चाळ – 2
- राजीव गांधी चाळ – 4
- शास्त्री नगर -4
- नेहरु चाळ – 1 (1 मृत्यू)
- इंदिरा चाळ – 4
- गुलमोहर चाळ – 1
- साईराज नगर – 1
- ट्रान्झिट कॅम्प – 1
- रामजी चाळ- 1
- सर्वोदय सोसायटी -2
- लक्ष्मी चाळ – 2
- शिवशक्ती नगर – 1
- माटुंगा लेबर कॅम्प – 4
#Maharashtra – 15 new COVID19 cases reported in Mumbai’s Dharavi: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) April 17, 2020
दरम्यान एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन हजाराच्या पार गेल्याने धाकधूक वाढली आहे. ‘जी दक्षिण’ वॉर्डमध्ये ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 388 वर पोहोचली आहे. मुंबईतील आठ वॉर्डमध्ये आतापर्यंत प्रत्येकी शंभरपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त आढळले आहेत.
जी दक्षिण, ई, डी, जी उत्तर, के पश्चिम, एच पूर्व, एम पूर्व, आणि के पूर्व या प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 100 कोरोनाबाधित आहेत. तर 85 पेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेला एल वॉर्डही अतिगंभीर प्रभागांच्या यादीत (Mumbai Dharavi Corona Patient) येतो.