Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Drive in vaccination centers list | मुंबईत प्रत्येक विभागात ड्राईव्ह इन लसीकरण होणार, तुमच्या जवळचे केंद्र बघा

लवकरच पालिकेकडून 14 ठिकाणी अशाप्रकारे ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु केली जाणार आहे. (Mumbai Drive in vaccination centers list)

Mumbai Drive in vaccination centers list | मुंबईत प्रत्येक विभागात ड्राईव्ह इन लसीकरण होणार, तुमच्या जवळचे केंद्र बघा
फोटो प्रातनिधिक
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 8:45 AM

मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत जवळपास 80 हून अधिक पालिकेसह खासगी केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मुंबईतील लोकसंख्या आणि लसीकरण केंद्रांच्या संख्येचा विचार करता पालिकेने प्रथम ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु केले आहे. यामुळे विशेषत: अपंग लोक आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे न राहता वाहनात बसून कोरोना लस घेता येत आहे. दादरमध्ये देशातील हे पहिलेच ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर लवकरच पालिकेकडून 14 ठिकाणी अशाप्रकारे ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु केली जाणार आहे. (Mumbai Drive in vaccination centers list)

ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ म्हणजे काय?

मुंबईतील दादर परिसरातील कोहिनूर टॉवर येथील पार्किंगमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले होते. अपंग लोक आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे न राहता  लस घेता यावी, या उद्देशाने या केंद्राची स्थापना करण्यात आली. यावेळी ज्यांना लस घ्यायची आहे, त्यांनी एका पार्किंग गेटने आत जायचे. त्यानंतर गाडीमध्येच बसून लस घ्यायची आणि मग वेगळ्या एक्झिट पॉईंटमधून बाहेर पडायचे, असा ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चा प्लॅन असतो.

ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ केंद्र वाढवणार

विशेष म्हणजे केवळ ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चनाही तर या ठिकाणी वॉक इन सेटअपही लावण्यात आला आहे. त्याठिकाणी 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना आत प्रवेश करून लस दिली जाईल. दरम्यान या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्राची युक्ती यशस्वी झाल्यानंतर आता पालिकेने अशाप्रकारची केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र 

  • अंधेरी स्पोर्ट्स क्लब ग्राऊण्ड
  • कूपरेज ग्राऊण्ड
  • शिवाजी स्टेडियम
  • ओव्हल मैदान
  • ब्रेबॉर्न स्टेडियम
  • एमआयजी ग्राऊण्ड
  • एमसीए ग्राऊण्ड
  • रिलायम्स जिओ ग्राऊण्ड
  • वानखेडे स्टेडियम
  • संभाजी उद्यान (मुलुंड)
  • सुभाष नगर ग्राऊण्ड (चेंबुर)
  • टिळक नगर ग्राऊण्ड (चेंबुर)
  • घाटकोपर पोलीस ग्राऊण्ड
  • शिवाजी मैदान (चुनाभट्टी)

दरम्यान मुंबईत लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता आता मुंबईतील 14 मोठी मैदाने व स्टेडियमवर ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सुरु करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ आणि दिव्यांगांची त्रासातून सुटका होणार आहे.

दादरमधील ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ बंद

दादर येथील कोहिनूर मिलच्या पार्किंग क्षेत्रात ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ ला दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना उत्तम प्रतिसाद मिळाला. पण यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी तत्काळ कोहिनूर पार्किंग क्षेत्रातील लसीकरण केंद्र बंद करावे, अशी सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला केल्या. वाहतूक विभागाच्या सूचनेचे पालन करत येथील लसीकरण केंद्र बंद करण्यात आले. पण दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी 14 मोठी मैदाने आणि स्टेडियमवर ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेंटर सुरु केली जाणार आहे.

‘ कोविन-ॲप’ नोंदणी आणि ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ नुसार लसीकरण

1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर अनेक केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी ज्या नागरिकांची ‘कोविन ॲप’ वर नोंदणी झाली, ज्यांना संबंधित लसीकरण केंद्रावर जो मिळालेल्या ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ अनुसारच लसीकरण करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. दरम्यान, 147 लसीकरण केंद्रे ही लशींच्या साठा उपलब्धतेनुसार कार्यरत आहेत.

पडताळणीनंरच प्रवेश!

‘कोवीन ॲप’ किंवा ‘कोविन पोर्टल’ यावर यशस्वीरित्या नोंदणी झाल्यावर ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ मिळालेल्या व्यक्तींचेच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सर्व लसीकरण केंद्रांवर संबंधित बाबींची पडताळणी केल्यानंतरच नागरिकांना लसीकरण केंद्रात प्रवेश द्यावा, असे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक!

वय वर्षे 45 पेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्या व्यक्तींना कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र हे ‘हार्ड कॉपी’ किंवा ‘सॉफ्ट कॉपी’ स्वरूपात सादर केल्यानंतर लसीकरण केंद्राच्या व्यवस्थापकांनी सदर बाबींची योग्य ती पडताळणी केल्यानंतर लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल. (Mumbai Drive in vaccination centers list)

संबंधित बातम्या :

मुंबईकरांनो लक्ष द्या, ‘कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’नुसारच लसीकरण

Corona Vaccine : लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंची महापालिका आयुक्तांशी चर्चा

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.