मुंबईत तीन वर्षात तब्बल 47 हजार 425 दुर्घटना

गेल्या तीन वर्षात मुंबईत तब्बल 47 हजार 425 दुर्घटना (Mumbai accident incident) घडल्या आहेत. ज्यामध्ये आगींसह, रेस्क्यू ऑपरेशन, भिंत कोसळणे, घर कोसळणे सारख्या घटना आहेत.

मुंबईत तीन वर्षात तब्बल 47 हजार 425 दुर्घटना
Follow us
| Updated on: Jan 03, 2020 | 6:58 PM

मुंबई : गेल्या तीन वर्षात मुंबईत तब्बल 47 हजार 425 दुर्घटना (Mumbai accident incident) घडल्या आहेत. ज्यामध्ये आगींसह, रेस्क्यू ऑपरेशन, भिंत कोसळणे, घर कोसळणे सारख्या घटनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे वर्ष 2019 मध्ये एकूण 16 हजार 360 एवढ्या दुघर्टना घडल्या आहेत. तसेच 2019 मध्ये पाच हजार 427 एवढ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. उर्वरीत घटनांमध्ये रेस्क्यूसह घर आणि इमारत दुघर्टना आणि चुकीच्या तक्रारींचा (Mumbai accident incident) समावेश आहे.

मुंबईत 2016 पासून आतापर्यंत या तीन वर्षांमध्ये आगींसह इतर घटनांच्या 47 हजार 425 तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये 15 हजार 139 एवढ्या आगीच्या घटना आहेत. तर रेस्क्युंच्या 17 हजार 529 घटना घडल्या. याशिवाय इतर घटनांच्या 13 हजार 564 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. घर कोसळणे, इमारत कोसळण्याच्या 964 घटना घडल्या आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पाचशे ते सहाशे घटना अधिक आहेत.

वर्ष 2019 मध्ये रेस्क्यूच्या एकूण 6 हजार 332 घटना घडल्या आहेत. यामध्ये पक्षी, प्राणी यांच्यासह अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीच्या या तक्रारी होत्या. तर आगीच्या एकूण पाच हजार 427 घटना घडल्या आहेत. आगीच्या घटनांपेक्षा रेस्क्युच्या घटनांमध्येही यावर्षी लक्षणीय वाढ झालेली आहे. गेल्या दोन वर्षांच्या घटनांच्या तुलनेत 2019 मध्ये सर्वाधिक रेस्क्युच्या तक्रारीमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

“आग विमोचनासह तिथे अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करत असतात. यामध्ये मनुष्यहानी आणि इतर मालमत्तांच्या नुकसानीचे प्रमाण कमीत कमी होण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करतात”, असं मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी आणि उपायुक्त प्रभात रहांगदळे यांनी सांगितले.

आगींसह इतर दुघर्टनांच्या तीन वर्षातील घटना : 47425

सन 2016-17 : 15704 सन 2017-18: 15361 सन 2018-19 : 16360

तीन वर्षातील मोठ्या स्वरुपाच्या आगींच्या घटना : 227 सन 2016-17 : 46 सन 2017-18 : 84 सन 2018-19 : 97

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.