मुंबईतल्या भायखळा भागात भीषण आग लागली होती. रहिवासी इमारती यापासून जवळच असल्यानं त्या भागातही या आगीनं एकच खळबळ उडाली होती.
झकेरीया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मोठी आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही आग भडकली होती.
या आगीमुळे भायखळ्यामध्ये धुराटे लोट दूरवर पसरल्याचं पाहायला मिळालं होतं. ही आग आणखी पसरु नये, यासाठी तातडीनं बचावकार्यही सुरु करण्यात आलं होतं.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्याही तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
नेमकी ही आग कशामुळे लागली, हे कळू शकलेलं नाही. आसपासच्या परिसरात या आगीमुळे धूर पसरला होता.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारात ही आग भडकली होती. अग्निशमक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.