मुंबईत गणेशोत्सव विसर्जनासाठी 20 हजार पोलिसांचा फौजफाटा, वाहतुकीतील बद्दलाबद्दल जाणून घ्या
गणपती बाप्पा मंगळवारी निरोप घेणार आहेत. गणपतीच्या मोठ्या मिरवणुका निघतील, मुंबईत गणेशोत्सव विसर्जनासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक विभागाने कशा प्रकारे तयारी केली आहे याबाबत सहपोलीस आयुक्त वाहतूक अनिल कुंभारे आणि सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, मढ आणि इतर चौपाट्यावर तयारी करण्यात आलेली आहे. 9 अप्पर पोलीस आयुक्त,40 डीसीपी, 56 एसीपी दर्जाचे अधिकारी बंदोबस्ताला असणारं आहेत. 20 हजारहून अधिक पोलीस अधिकारी बंदोबस्त असतील. एसआरपीएफचे १० हजार जवान बंदोबस्तला तैनात करण्यात येणार आहेत. बीएमसीच्या सोबत अनेक ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे, असं पत्रकार परिषदेत सत्यनारायण चौधरी यांनी सांगितलं.
महिला सुरक्षा मुंबई पोलीसांसाठी प्राथमिकता आहे. त्यासाठी सध्या वेशातील पोलिस, कंट्रोल रूम आणि निर्भया पथक अश्या माध्यमातून आम्ही बंदोबस्त ठेवणार आहोत. ठराविक ठिकाणी बीएमसी आणि एलएनटीच्या माध्यमातून आम्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत त्यानुसार लक्ष ठेवण्यात येणार आहे. 20,500 पोलीस कॉन्स्टेबल तसेच अनेक अधिकारी तैनात असणार आहेत. मुंबईकरांना आमच आवाहन आहे की उत्साहात विसर्जन मिरवणूक साजरा करा काही आवश्यकता असल्यास पोलिसांना तातडीने कळवा. गर्दी असणार आहे त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या, असं आवाहनही सत्यनारायण चौधरींनी केलं.
वाहतूक विभागाचे 2500अधिकारी आणि कर्मचारी आमचे तैनात असणार आहेत. आम्ही डिजिटल माध्यमातून वेगवेळ्या रुटसंदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार लोकांनी प्रवासाच प्लानिंग करावं. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेपासून, फ्री वे तसेच मेट्रो जंक्शन पासून कोस्टल रोड आणि सी लिंक असा हा ग्रिन कॉरिडॉर असेल. आम्ही बीएमसीला केलेल्या विनंतीनुसार कोस्टल रोड 24तास सुरू राहणार आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडून वाहतुकीत खोळंबा होऊ नये यासाठी हा कॉरिडॉर तयार करण्यात आल्याचं सहपोलीस आयुक्त वाहतूक अनिल कुंभारे यांनी सांगितलं.