मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, तरीही वाहतूक कोंडी
रायगड : गोवा हे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचं प्रसिद्ध डेस्टिनेशन. त्यात सलग सुट्या, वीकेंड आणि नाताळमुळे मुंबई, ठाणे, पालघर, वसईकर रायगडसह कोकण आणि गोव्याकडे मोठ्या संख्येने निघाले आहेत. यामुळे रायगड पोलीस प्रशासनाने मुबंई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. अवजड वाहनांनी महामार्गाजवळील हॉटेल, ढाबे आणि पेट्रोलपंपाचा आधार घेतला असल्याचं चित्र दिसून येत आहे. मुबंईकर मोठ्या संख्येने […]
रायगड : गोवा हे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचं प्रसिद्ध डेस्टिनेशन. त्यात सलग सुट्या, वीकेंड आणि नाताळमुळे मुंबई, ठाणे, पालघर, वसईकर रायगडसह कोकण आणि गोव्याकडे मोठ्या संख्येने निघाले आहेत. यामुळे रायगड पोलीस प्रशासनाने मुबंई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. अवजड वाहनांनी महामार्गाजवळील हॉटेल, ढाबे आणि पेट्रोलपंपाचा आधार घेतला असल्याचं चित्र दिसून येत आहे.
मुबंईकर मोठ्या संख्येने वीकेंड आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात आणि गोव्यात जातात. मुबंई-गोवा महामार्गाला लागून असलेले रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले असून गोव्याकडेही पर्यटकांचा कल दिसून येतोय. वीकेंड, नाताळ, 31 डिसेंबर आणि सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मुबई-गोवा महामार्ग वाहनांच्या गर्दीने फुलला आहे.
पनवेल ते पेण दरम्यान जिते, हमरापूर, पेण, वडखळ, गडब, माणगाव या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने अवजड वाहनांना महामार्गावर वाहतुक बंदीचा निर्णय जाहीर केल्याने रायगड आणि कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.
गौण खनिज, 16 टनांपेक्षा अधिक वजन क्षमता असणारी वाहने, ट्रक, मल्टीएक्सेल, ट्रेलर आदी अवजड वाहनांना ही वाहतूक बंदी लागू राहणार आहे. तर दूध, औषध, पेट्रोल, गॅस, भाजी आदी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. या वाहतूक बंदीमुळे अवजड वाहनचालकांनी आपली वाहने ढाबे, पेट्रोल पंप अशा ठिकाणी उभी केली आहेत.
मुबंई गोवा महामार्गावर पनवेल, पेण, रामवाडी, वडखळ, नागोठणे, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड ते पोलादपूरपर्यंत अनेक ठिकाणी महामार्ग चौपदरीकरणाचे काम चालू आहे. काही ठिकाणी रस्ता बंद आहे, तर काही ठिकाणी खोदलेला.
पुलांचं काम चालू आहे आणि त्यातच अवजड वाहनांमुळे छोटी वाहने, प्रवासी वाहने यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. म्हणून अखेर अवजड वाहनांना महामार्गावरून बाजूला केल्यामुळे पर्यटकांच्या त्रासात थोडी कमी झाली आहे. तरी पेण, वडखळ, कोलाड, माणगाव या ठिकाणी पर्यटकांना वाहतूककोंडीला सामोरं जावं लागतंय. पुढील आठवडाभर महामार्गावर हीच परिस्थिती कायम राहणार आहे.