Mumbai Local : ओव्हरहेड वायर तुटली, मानखुर्द-पनवेल दरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत; चाकरमानी त्रस्त

Mumbai Local : रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकांमध्ये तुफान गर्दी झाली आहे. त्यातच मुंबई आणि नवी मुंबईत पावसाने चांगला जोर धरल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली असून त्यामुळे प्रवाशी आणखीनच संतप्त झाले आहेत.

Mumbai Local : ओव्हरहेड वायर तुटली, मानखुर्द-पनवेल दरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत; चाकरमानी त्रस्त
ओव्हरहेड वायर तुटली, मानखुर्द-पनवेल दरम्यान लोकल वाहतूक विस्कळीतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 8:41 AM

मुंबई: मानखुर्द ते पनवेल दरम्यान हार्बर मार्गावर (mumbai harbour local) ओव्हरहेड वायर तुटल्याने या मार्गावरील लोकलसेवा (mumbai local) विस्कळीत झाली आहे. पहिल्याच पावसात ऐन सकाळी सकाळीच लोकलची ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. तब्बल 15 ते 20 मिनिटे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना सीएसटीकडे जाण्यासाठी अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचा किंवा ट्रान्स हर्बरचा उपयोग करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे. मात्र, ऐन सकाळी सकाळीच लोकलचा फटका बसल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत. तसेच रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकांमध्ये तुफान गर्दी झाली आहे. त्यातच मुंबई आणि नवी मुंबईत (mumbai) पावसाने चांगला जोर धरल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली असून त्यामुळे प्रवाशी आणखीनच संतप्त झाले आहेत.

मुंबईसर नवी मुंबईत मध्यरात्रीापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. तसेच पावसाने चांगला जोर धरल्याने मुंबई आणि नवी मुंबईत हवेत गारवा पसरला आहे. मात्र, पहिल्याच पावसात मानखुर्द ते पनवेल दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे या मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईला येणाऱ्या लोकल नवी मुंबईतच थांबल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. त्यामुळे हार्बर मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी झाली. ऐन सकाळी सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशी चांगलेच त्रस्त झाले होते.

हे सुद्धा वाचा

लोकलचा खोळंबा आणि पाऊस

एकीकडे लोकलचा खोळंबा झालेला असतानाच दुसरीकडे पावसाने चांगलाच जोर धरल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. गर्दीतून लोकलमध्ये चढताना प्रवाशांची चांगलीच धावपळ झाली आहे. प्रचंड गर्दीमुळे काही प्रवाशी फर्स्ट क्लासच्या डब्यातूनही प्रवास करताना दिसत आहेत.

रेल्वेकडून नवा पर्याय

हार्बर रेल्वे विस्कळीत झाल्याने सर्वच स्थानाकात तुफान गर्दी झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सीएसटीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग अवलंबण्यास सांगितलं आहे. तसेच ट्रान्सहार्बरवरून प्रवास करण्यास प्रवाशांना मुभा दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी ट्रान्स हार्बरवरून प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. तर काही प्रवाशांनी थेट एसटी आणि बसने मुंबई गाठण्यास सुरुवात केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.