आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ, व्हॉट्सअ‌पवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप, मुंबईत विद्यार्थ्यांचा ठिय्या

नर्सिंग आणि पॅरामेडीकलचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे.सील फुटलेला पेपर पाहून विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेरच ठिय्या आंदोलन केलं आहे. परीक्षा सध्या थांबवल्याची झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ, व्हॉट्सअ‌पवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप, मुंबईत विद्यार्थ्यांचा ठिय्या
आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 4:17 PM

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत मुंबईतही गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे.  महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या गट क प्रवर्गातील गोंधळ आता पुणे नाशिकनंतर मुंबईत पोहोचला आहे.मुंबईतील आरोग्य सेवा परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झालाय. नर्सिंग आणि पॅरामेडीकलचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे.सील फुटलेला पेपर पाहून विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेरच ठिय्या आंदोलन केलं आहे. परीक्षा सध्या थांबवल्याची झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अडीच वाजता विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपवर पेपर, विद्यार्थ्यांचा दावा

दुपारच्या सत्रातील पेपरची वेळ 3 ते 5 अशी वेळ होती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी अडीज वाजताच व्हॉटसअ‌ॅपर पेपर आल्याचा दावा केलाय. सध्या परीक्षा केंद्रावर प्रचंड तणाव आणि गोंधळ निर्माण झाला असून पोलीस आणि परिक्षार्थी आमने सामने आले आहेत. मुंबईतील परेरा वाडी साकीनाका अंधेरी इथल्या शिवेनरी विद्या मंदिरात आरोग्य विभागाचा पेपर होणार होता. यापूर्वी हॉल तिकीट आणि सेंटर बदलल्यानं विद्यार्थी हैराण होते.

पुणे नाशिक नंतर मुंबईत गोंधळ

पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं होते. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले होते. नाशिक जिल्ह्यातील गिरणारे परीक्षा केंद्रावर देखील गोंधळ पाहायला मिळाला. पेपर प्रक्रिया राबवणाऱ्या व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. विद्यार्थी संख्ंयेच्या कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचा दावा देखील विद्यार्थ्यांनी केला होता.

इतर बातम्या:

सावळा गोंधळ सुरुचं, आरोग्य विभाग गट क परीक्षेच्या नियोजनाचा बोजवारा, पुणे नाशिकमध्ये विद्यार्थी संतप्त

पिंपरी-चिंचवडनंतर पुणे महापालिकेसाठी शरद पवार मैदानात, दिवाळीनंतर बैठकीचं आयोजन

Mumbai Health Department exam student accused Question paper leak on Whats app

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.