Sonu Sood | सोनू सूदला मुंबई हायकोर्टाचा झटका, बीएमसीविरोधातील याचिका फेटाळली
मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता सोनू सूदनं बीएमसीच्या नोटीस विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. ( Mumbai High Court Sonu Sood)
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता सोनू सूदनं बीएमसीच्या नोटीस विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने जुहू पोलिसांत तक्रार केली होती. सोनू सूदने जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केले असल्याचा दावा पालिकेने केला होता. पालिकेने अवैध बांधकामावर आक्षेप नोंदवला होता. सोनू सूदनं पालिकेच्या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. न्यायालयानं यापूर्वी मुंबई महापालिकेला 13 जानेवारीपर्यंत काहीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. (Mumbai High Court dismiss Actor Sonu Sood challenge to BMC Notice)
बीएमसीच्या तक्रारीत काय?
बीएमसीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं, “सोनू सूद यांनी स्वत: मालकीच्या जमिनीच्या वापरामध्ये बदल केला आहे. त्याशिवाय निश्चित प्लानमध्ये अतिरिक्त निर्माण करुन रहिवासी इमारतीला हॉटेलच्या इमारतीत रुपांतरीत केलं. यासाठी त्यांनी अथॉरिटीकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली नाही.”
इतकंच नाही तर बीएमसीने सोनू सूदवर नोटीसकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला आहे. सिविक अथॉरिटीने सांगितलं, नोटीस दिल्यावरही ते अनधिकृत निर्माण करत राहिले. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायदा कलम 7 अंतर्गत गुन्हा केला आहे.
[Breaking] Bombay High Court Dismisses Sonu Sood’s Challenge Against BMC’s Demolition Notice @SonuSood,@mybmc https://t.co/XSmvkiNHCv
— Live Law (@LiveLawIndia) January 21, 2021
सत्र न्यायालयाचा निर्णयही विरोधात
अभिनेता सोनू सूदनं रहिवासी इमारतीला हॉटेलच्या इमारतीत रुपांतरित केल्याचा दावा मुंबई महापालिकेने केल्यानंतर हे प्रकरण मुंबईतील सत्र न्यायालयात गेले होते. सत्र न्यायालयानं सोनू सूदची याचिका फेटाळली होती.
बीएमसीनं महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्याच्या कलम 53 नुसार ऑक्टोबर 2020 मध्ये सोनू सूदला नोटीस दिली होती. मुंबई महापालिकेनं सोनू सूद सातत्यानं रहिवासी इमारतीचं रुपांतर हॉटेलमध्ये करत असल्याचा दावा केला होता.
मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत सोनू सूदनं शक्तीसागर इमारतीमध्ये कोणत्याही पद्धतीचं अवैध बांधकाम केले नसल्याचा दावा केला होता. एमआरटीपी कायद्यात बसणारे बदल केल्याचा दावा सोनू सूदच्या वकिलांनी केला होता.
संबंधित बातम्या:
मोठी बातमी : सोनू सूदच्या इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पालिकेच्या रडारवर; BMC ची पोलिसांकडे तक्रार
Special Story : सोनू सूदला अनधिकृत बांधकाम भोवणार?; जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरणं?
(Mumbai High Court dismiss Actor Sonu Sood challenge to BMC Notice)