Mumbai Hoarding Collapse : ‘नशीब आले धावून, पण माझ्यासमोर तर कित्येक जण दबले’, 120 फूट उंच होर्डिंग पडल्यानंतर वाचलेल्या व्यक्तीने सांगितला तो थरारक क्षण

Mumbai Hoarding Collapse घटनेने सर्वच हादरले आहेत. घाटकोपरमध्ये 120 फूट उंच होर्डिंग पडले. त्यात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दुर्घटनेवेळी पेट्रोल पंपावरील एका प्रत्यक्षदर्शीचा याविषयीचा थरार अनुभव तुम्हाला हादरवल्याशिवाय राहणार नाही...

Mumbai Hoarding Collapse : 'नशीब आले धावून, पण माझ्यासमोर तर कित्येक जण दबले', 120 फूट उंच होर्डिंग पडल्यानंतर वाचलेल्या व्यक्तीने सांगितला तो थरारक क्षण
अक्षम्य बेपर्वाईचे बळी, थरारक अनुभव
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 10:01 AM

मुंबईतील घाटकोपर परिसरात 120 फूट उंच होर्डिंग कोसळल्याची घटना काल घडली. त्यात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर 70 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 15 हजार चौरस फुटाहून अधिक असलेले होर्डिंग पडतानाचा थरार एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने कथन केला आहे. तो या घटनेचा साक्षीदार आहे. हा प्रसंग अजूनही त्याच्या डोळ्यासमोरुन हटलेला नाही. नशीब बलवत्तर म्हणून आपण वाचल्याची, त्याची प्रतिक्रिया जितकी बोलकी आहे, तितकीच काळीज चिरणारी आहे.

इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर

  • सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. त्यावेळी अमित गुपचंदानी हे घाटकोपर येथील बीपीसीएल पेट्रोल पंपावर कार घेऊन आले होते. इंधन भरण्यासाठी ते रांगेत होते. त्यांना अवघ्या पुढच्या काही सेकंदात काय होणार आहे, याची पुसटशी कल्पना नव्हती. तर या घटनेत काहींचे प्राण वाचविणारे ते देवदूत ठरतील, हे पण त्यांच्या ध्यानी मनी नव्हते.
  • मुंबईत बेमौसमी पाऊस कोसळत होता. वादळी वारे सुरु होते. त्याचवेळी या पेट्रोलपंपावर हे 100 फूट लांबीचे अवैध होर्डिंग कोसळले. वजनदार होर्डिंग कोसळताच काही जण घटनास्थळीच गतप्राण झाले. या दुर्घटनेत 74 जण जखमी झाले.

अमित ठरले देवदूत

हे सुद्धा वाचा
  1. “कारमध्ये इंधन भरण्याच्या प्रतिक्षेत मी आणि माझा मित्र या पेट्रोलपंपावर थांबलो होतो. त्यावेळी तुफान हवा सुटली. पाऊस सुरु होता आणि अचानक पेट्रोल पंपावर होर्डिंग पडले. काही लोक होर्डिंग खाली दबले तर काही आजुबाजूला पळाले” या घटनेत वाचलेले अमित गुपचंदानींनी हे थरारनाट्य एका वृत्तसंस्थेला सांगितले.
  2. मी आणि माझ्या मित्राने दबलेल्या काही लोकांना लागलीच बाहेर काढले आणि तिथे उपलब्ध वाहनांमध्ये बसवून उपचारासाठी पाठवल्याची माहिती अमित यांनी दिली. या घटनेसंदर्भात मुंबईचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अगोदर हे होर्डिंग अवैध असल्याचे सांगितले होते. त्यांच्या मते होर्डिंगसाठी पालिकेचे अनुमती घेण्यात आली नाही. आता या मुद्यावरुन मैं-मैं-तू-तू सुरु असले तरी या घटनेने पुण्यातील होर्डिंग कोसळल्याच्या घटनेची आठवण करुन दिली आहे. त्यानंतरही होर्डिंग धोरणाबाबत राज्य शासनाची अक्षम्य बेपर्वाई दिसून येत आहे.
Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.