Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीचं ठरलंय; 25 मतदारसंघांचं जागावाटप जाहीर करणार; जयंत पाटलांनी तारीख सांगितली

Jayant Patil on Mavaikas Aghadi Jagavatap for Loksabha Election 2024 : आमचं सगळं ठरलंय, 'या' दिवशी जागावाटप जाहीर करू; जयंत पाटलांनी तारीख सांगितली. लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं मोठं विधान. जागावाटपाबाबत मोठी प्रतिक्रिया. वाचा...

महाविकास आघाडीचं ठरलंय; 25 मतदारसंघांचं जागावाटप जाहीर करणार; जयंत पाटलांनी तारीख सांगितली
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 4:04 PM

गोविंद ठाकूर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 20 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. लोकसभेच्या जागावाटपावरून इंडिा आघाडीत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या चर्चांवर त्यांनी पडदा टाकला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडीची 2 दिवसांत बैठक पार पडेल. 25 तारखेला जागा वाटप जाहिर होईल. एकत्रित जागा वाटप बैठक त्याचं दिवशी आहे. कोणत्याही प्रकारचे वाद आमच्यात नाहीत, असं जयंत पाटील यांनी जाहीर केलं.

सुनावणीबाबत जयंत पाटील काय म्हणाले?

आज आमची सुनावणी पार पडणार आहे. समोरच्या बाजूने वेळ मागितला. जाण्याची शक्यता आहे. आज फेरसाक्ष पार पडेल का? याबाबत थोड्या वेळात कळेल. शरद पवार हे सर्वांना बोलवायचे आणि निर्णय घ्यायचे प्रांताध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणुन तटकरे यांनी दीर्घकाळ काम केलं आहे. शरद पवार यांनी एकांगी कधीही निर्णय घेतला नाही, असं जयंत पाटील म्हणालेत.

शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या सुनावणी मध्ये फरक आहे आम्ही पूर्वानुभवानुसार घटनेमध्ये काही बदल केलेले आहेत. आम्ही योग्य खबरदारी घेतलेली आहे. अजित पवार गटाने मुदत वाढ मागितली आहे. आमच्या वकिलांनी त्यांना विरोध केला पण अध्यक्षांनी वेळ मागितला. मला वाटतं आज आमची साक्ष होईल. अनिल पाटील हेच 2019 आमच्या पक्षात आले. त्यांना आमचा पक्ष कशा चालतो, त्यांना माहीत नाही, असंही जयंत पाटील म्हणालेत.

मराठा आरक्षण आंदोलनावर जयंत पाटील म्हणाले…

असंख्य मराठा आंदोलकांसोबत मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने येत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केलं जाणार आहे. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांना वेळ वाढवून दिला होता. सरकारने वेळोवेळी आश्वासन दिली आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आवहान केलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवायला हवा, असंही मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.