राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी- जयंत पाटील

बेळगावसह सीमाभागात आज मराठी बांधवांकडून काळा दिन पाळला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार भक्कमपणे उभं असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यांनी काळी फित लावून कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचाही निषेध नोंदवला.

राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी- जयंत पाटील
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 12:05 PM

मुंबई: “आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल”, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. बेळगावसह सीमाभागात आज काळा दिवस पाळण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. (Mumbai Jayant Patil protests against Karnataka government’s repression)

कर्नाटकरात मराठी बांधवांवर होणारा अन्याय, अत्याचाराचा निषेध मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हाताला काळी फित लावून निषेध व्यक्त केला. राज्य सरकारमधील सर्व मंत्रीही आज निषेध व्यक्त करत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. राज्यातील जनता सीमा भागातील मराठी भाषिक लोकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असलं तरी कर्नाटकमधील मराठी बांधवांवरील अन्याय थांबलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा निषेध नोंदवत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

मराठी बांधवांनी कानडी सरकारची बंदी झुगारली

दरवर्षीप्रमाणे आजही काळा दिन रॅलीला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. सोबतच काळे कपडे घालायलाही मनाई करण्यात आली आहे. मात्र, ही बंदी झुगारून सीमा भागातील मराठी बांधव मराठा भवन येथे एकत्र आले. यावेळी त्यांनी मराठी भाषिकांवर होणाऱ्या दडपशाहीचा निषेध नोंदवला. सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच असेल असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री सवदी यांचाही मराठी भाषिकांनी चांगलाच समाचार घेण्यात आला. शिवाय सीमाप्रश्नी अग्रेसर असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात सत्तेत आहेत. त्यामुळे हा प्रश्न आतातरी तडीस लागेल, अशी आशा या मराठी भाषिकांनी व्यक्त केली आहे.

हसन मुश्रीफ, संजय राऊतांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर

‘बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत तो महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही, अशी दर्पोक्ती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली आहे. सदवी यांच्या या वक्तव्याचा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. चंद्र, सूर्य कशाला?, तुमचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी बेळगाव महाराष्ट्रात असेल, असं जोरदार प्रत्युत्तर हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मण सदवींना दिलं आहे.

लक्ष्मण सदवी यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.  सूर्य-चंद्र तर राहतीलच, आम्हाला इतरांकडून ज्ञान घेण्याची गरज नाही, त्यांनी त्यांचं पाहावं, असा टोला राऊतांनी सवदी यांना लगावला. बेळगावातील सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

सूर्य चंद्राचे ज्ञान शिकवू नका, संजय राऊतांनी बेळगावप्रश्नावरुन कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले

कानडी पोलिसांचा आदेश झुगारत मराठी बांधव काळा दिन साजरा करण्यासाठी एकत्र, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध

Mumbai Jayant Patil protests against Karnataka government’s repression

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.