केजरीवाल जेलमध्ये गेले अन् संजय राऊत…; किरीट सोमय्या यांच्या विधानाने भुवया उंचावल्या
Kirit Somaiya on Arvind Kejriwal and Sanjay Raut : किरीट सोमय्या यांच्या विधानाने भुवया उंचावल्या; केजरीवालांच्या अटकेचा दाखला देत काय म्हणाले? मुंबईत किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी सोमय्या यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. वाचा सविस्तर...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी अटक झाली आहे. 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी राऊस अव्हेन्यू कोर्टाने ठोठावली आहे. यावर विरोधक पक्षांनी हल्ला चढवला आहे. आपचे नेते ठिकठिकाणी आंदोलनं करत आहेत. तर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी या अटकेचा निषेध केला आहे. आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजप-नेते- किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय. अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेले. संजय राऊत मात्र वाचले असा खोचक टोला सोमय्या यांनी लगावला आहे.
केजरीवाल यांचं उदाहरण, राऊतांवर निशाणा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात गेले. खासदार संजय राऊत वाचले. संजय राऊत आणि त्यांच्या परिवारने देखील दारूचा धंदा सुरू केला होता. ठाकरे सरकारचा वाईन घोटाळा, त्याचं उदाहरण आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी 2022 मध्ये वाइन धोरण बदललं. वाईन म्हणजे दारू नाही? संजय राऊत परिवाराने महाराष्ट्रात अशोक गर्ग मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेडसोबत भागीदारी केली होती, असा प्रति शाब्दिक हल्ला किरीट सोमय्या यांनी केला आहे.
राऊत कुटुंबावर आरोप
महाराष्ट्राचा हा वाइन दारू घोटाळा आम्ही उघडकीला आणला होता. संजय राऊत यांच्या दोन्ही मुलींची अशोक गर्ग यांच्या मॅग्पी ग्रुपमध्ये भागीदारी आहे. राऊत यांच्या दोन्ही मुलींची अशोक गर्ग यांच्या मॅग्पी ग्रुपमध्ये भागीदारी आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कुटुंबाची एका मोठ्या उद्योगपतीच्या वाईन कंपनीत भागीदारी आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दिल्ली वाईन घोटाळा ज्या पद्धतीने होता तसा मुंबई वाइन घोटाळा आहे. सरकारने आकलन केले तर आकडे खरे समोर येतील. दोन्ही नेत्यांशी मी बोलणं केलं आहे. संजय राऊत कुटुंबावर कृपा झाली होती. राऊत यांची मुलगी विधीता आणि पूर्वशी मॅग्पी DFS PVT LTD मध्ये भागीदार बनल्या. या सर्व घोटाळ्याप्रकरणी ब्लॅक पेपर समोर ठेवावा, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
राऊत काय म्हणाले होते?
अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर आणि बदल्याच्या भावना आणि घाबरून खोट्या केसमध्ये अटक केली आहे. हे सर्व जण जाणत आहेत. विश्वगुरू देखील हे जाणून आहेत. कंसाला ज्याला ज्याची भीती होती त्यांनी सर्वांना तुरुंगात टाकले. देवाला देखील तुरुंगात टाकले होते. कंस मामाने… श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि कंसाचा वध केला, अशी टीका आज संजय राऊतांनी केली.
संजय राऊतांच्या या टीकेला किरीट सोमय्या यांनी उत्तर दिलं आहे. मोदींना संजय राऊत कधी कंस बोलतात. उद्धव ठाकरे औरंगजेब बोलतात. सोनिया गांधी हत्यार… आणि राहुल गांधी चोर म्हणतात. पण या सगळ्यांना कोविड घोटाळा,खिचडी घोटाळा हिशोब द्यावा लागणार आहे, असं सोमय्या म्हणाले.