Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kurla Bus Accident CCTV Footage Video : कुर्ला बस अपघातावेळी काय घडलं? सीसीटीव्हीमध्ये काय?

Kurla Bus Accident CCTV Footage Video : मुंबईतील कुर्ला भागात काल रात्री उशीरा प्रचंड भीषण अपघात झाला. बेस्ट बस थेट बाजारात घुसली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचं CCTV Footage समोर आलं आहे. वाचा सविस्तर...

Kurla Bus Accident CCTV Footage Video : कुर्ला बस अपघातावेळी काय घडलं? सीसीटीव्हीमध्ये काय?
कुर्ला बस अपघात
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 9:21 AM

मुंबईतील कुर्ला भागात काल भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26 जण जखमी झाले आहेत. कुर्ला स्टेशन परिसरात बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आहे. 25 ते 30 वाहनांना धडक दिली आहेत. काही नागरिकांना चिरडलं देखील आहे. यापैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. जखमींना जवळच्याच भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आतापर्यंत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 25 ते 30 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.दोन तासांनी क्रेनच्या साह्याने बस बाहेर काढण्यात आली आहे. बसचा स्पीड देखील अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर बसच्या काचा देखील फुटलेल्या आहेत.

सीसीटीव्हीमध्ये काय?

सध्या बस ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. ही बस 332 होती कुर्ल्यापासून अंधेरीला जात होती. हा अपघात कुर्ल्यात घडला आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात भरधाव वेगात बस लोकांना चिरडताना दिसत आहे. रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या लोकांना या बसने धडक दिल्याचं दिसत आहे. अंगावर काटा आणणारी ही सगळी दृश्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.

बस अपघातात पाच जणांचा मृत्यू

कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातात आता पर्यंत मृतांचा आकडा 5 झाला आहे. तर जखमी 26 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विजय विष्णू गायकवाड(७०), आफ्रीन अब्दुल सलीम शहा(१९), अनम शेख(२०), कणीस फातिमा गुलाम कादरी(५५), शिवम कश्यप(१८) अशी मृतांची नावे आहेत.

जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल ६० प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी बस चालक संजय मोरे(५४) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली गेली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कुर्ला पोलीस करीत आहे.

कुर्ल्यातील कालच्या भीषण अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस स्थानक आज बंद ठेवण्यात आलं आहे. कालच्या घटनेनंतर कुठलाही अनुश्चित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. बेस्ट बस बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. चालत किंवा रिक्षाने इप्सितस्थळी पोहचावं लागत आहे.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.