Mumbai Local : दुरुस्तीच्या कामामुळे मुंबई लोकलचा मेगा ब्लॉक, कोणत्या मार्गावर किती वेळ लोकल बंद?
दुरुस्तीच्या कामामुळे मुंबई लोकल रविवारी (28 फेब्रुवारी) उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे.
मुंबई : दुरुस्तीच्या कामामुळे मुंबई लोकल रविवारी (28 फेब्रुवारी) उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे. मेन लाइनवर माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 04.05 दरम्यान हे देखभाल दुरुस्तीचं काम चालणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. या लोकल त्यांच्या नियोजित थांब्यावर थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा आपल्या निश्चित स्थानकांवर पोहोचतील (Mumbai Local Mega Block on 28th February 2021 Updates).
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आगमन होणार्या अप जलद सेवा अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने आपल्या गंतव्य स्थानकावर पोहोचतील.
हार्बर लाइन कधी कोठे बंद राहणार?
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर लाइन सकाळी 11.40 ते दुपारी 04.40 दरम्यान बंद राहणार
- चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 04.10 दरम्यान बंद राहणार
- सकाळी 11.34 ते दुपारी 04.47 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर सेवा बंद राहणार
- सकाळी 9.56 ते दुपारी 04.43 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वांद्रे/गोरेगावसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार.
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी 9.5. ते दुपारी 03.20 पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथून सुटणाऱ्या अप हार्बर सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी 10.45 ते दुपारी 04.58 पर्यंत गोरेगाव/वांद्रे येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. याशिवाय ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी
ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 06 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी राहील. पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन मध्य रेल्वेनं केलं आहे.
हेही वाचा :
मुंबई लोकलमध्ये पठ्ठ्या मास्क डोळ्यावर लावून झोपला, महाराष्ट्राचे मंत्री म्हणाले, कोरोनाची काय चूक?
लोकलच्या फेऱ्या कमी होणार का, मुंबईत लॉकडाऊन होणार? पालकमंत्री अस्लम शेख म्हणतात…..
हार्बर लोकल सेवा पुन्हा एकदा ठप्प; प्रवाशांचा खोळंबा
व्हिडीओ पाहा :
Mumbai Local Mega Block on 28th February 2021 Updates