मुंबईच्या तीन रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर आणि मध्य रेल्वेवर उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मुंबईच्या तीन रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी पाहा संपूर्ण वेळापत्रक
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 9:35 AM

Mumbai Local Mega Block News : असंख्य मुंबईची आणि मुंबईकरांची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर आणि मध्य रेल्वेवर उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. तर हार्बर रेल्वेवर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक काय?

मुंबई उपनगरीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. तर विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान जलद मार्गावर धावणाऱ्या गाड्या धीम्या मार्गावर धावतील. यामुळे विक्रोळी, कंजूरमार्ग, नाहूर, मुलुंड, भांडुप, ठाणे येथील स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत.

हार्बर रेल्वेवर अप-डाऊन मार्गावर ब्लॉक

तर हार्बर रेल्वेवर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे परिणामी ब्लॉक काळात पनवेल आणि वाशीहून सीएसएमटीला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या बेलापूर मार्गावरून बदलून धावतील. तसेच या मार्गावरील काही गाड्यांची सेवा रद्द करण्यात येईल. तर पश्चिम रेल्वेवर रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत मेगाब्लॉक असेल.

पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत ब्लॉक असेल, परिणामी ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि माहिम स्थानकांदरम्यान सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या डाउन जलद मार्गावर चालवल्या जातील. त्यामुळे या गाड्या महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहिम स्थानकांवर थांबणार नाहीत. पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड या ठिकाणी फ्लाय ओव्हर सस्पेंशनमुळे लोकल थांबणार नाहीत. तर लोअर परळ आणि माहीम स्थानकांवरील फ्लॅटफॉर्मच्या अपुऱ्या लांबीमुळे काही लोकल गाड्या थांबणार नाहीत.

पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.