मुंबईत रेल्वे रुळावरील प्रवाशांच्या बळीवर कोरोनाने लावला ब्रेक, गेल्या वर्षीच्या तुलनेत 65 टक्के घट

वर्ष 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये रेल्वे अपघातांमध्ये तब्बल 65 टक्के घट झाली आहे.

मुंबईत रेल्वे रुळावरील प्रवाशांच्या बळीवर कोरोनाने लावला ब्रेक, गेल्या वर्षीच्या तुलनेत 65 टक्के घट
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 3:07 PM

मुंबई : मुंबईची उपनगरीय लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाईफ लाईन (Passengers Death On Railway Track). दररोज 80 लाखपेक्षा जास्त प्रवाशी उपनगरीय रेल्वे गाड्यांतून प्रवास करत होते. परंतु, कोरोना महामारीमुळे मार्च 2020 पासून लोकल ट्रेन प्रावासासाठी सामान्य प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे वर्ष 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये रेल्वे अपघातांमध्ये तब्बल 65 टक्के घट झाली आहे. माहितीच्या अधिकार अधिनियमांतर्गत ही माहिती देण्यात आली आहे (Passengers Death On Railway Track).

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलीस यांच्याकडे जानेवारी 2020 पासून ते डिसेंबर 2020 पर्यंत मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यातून पडून किंवा रेल्वे रुळ ओलांडताना किती लोकांचा मृत्यू झाला किंवा किती लोक जखमी झाले आहे, याची माहिती मागितली होती. या संदर्भात मुंबई रेल्वे पोलिसांचे जनमाहिती अधिकारी यांनी माहिती पुरवली आहे.

माहितीनुसार, मुंबई उपनगरीय रेल्वे रुळावर रेल्वेनगाड्यातून पडून किंवा रुळ ओलांडताना 1,116 प्रवाशांनी आपले जीव गमावले आहे. सदर दुर्घटनेत 983 पुरुष आणि 133 महिला प्रवाशांचा समावेश आहे. तसेच, 878 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामध्ये 688 पुरुष आणि 190 महिला प्रवाशांचा समावेश आहे. त्यात मध्य रेल्वे मार्गावर एकूण 523 प्रवाशांचा मृत्यू आणि 747 प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच, पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण 369 प्रवाशांचा मृत्यू आणि 355 प्रवासी जखमी झाले आहे.

कोणत्या कारणाने किती मृत्यू आणि जखमी?

>> रुळ ओलांडताना 730 प्रवाशांचा मृत्यू, 129 जखमी

>> चालत्या गाडीतून पडून 177 प्रवाशांचा मृत्यू, 361 जखमी

>> खांबाचा फटका लागून 2 प्रवाशांचा मृत्यू, 12 जखमी

>> प्लॅटफार्मवर पडून 1 प्रवाशाचा मृत्यू, 7 जखमी

>> विजेचा शॉक लागून 4 प्रवाशांचा मृत्यू, 7 जखमी

>> आत्महत्या करुन 27 प्रवाशांचा मृत्यू

>> नैसर्गिक मृत्यू आजारपणाने 167 प्रवाशांचा मृत्यू, 114 जखमी

>> अन्य कारणाने 6 प्रवाशांचा मृत्यू, 155 जखमी

>> अज्ञात कारणाने 2 प्रवाशांचा मृत्यू, 1 जखमी

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात रेल्वे रुळ ओलांडताना 2013 पासून 2019 पर्यंत एकूण 24,534 प्रवाशांनी प्राण गमावले आणि एकूण 26,675 प्रवासी जखमी झाले.

वर्षाप्रमाणे किती मृत्यू आणि लोक जखमी?

>> 2013 मध्ये एकूण 3506 प्रवाशांचा मृत्यू, 3318 जखमी

>> 2014 मध्ये एकूण 3423 प्रवाशांचा मृत्यू, 3299 जखमी

>> 2015 मध्ये एकूण 3304 प्रवाशांचा मृत्यू, 3349 जखमी

>> 2016 मध्ये एकूण 3202 प्रवाशांचा मृत्यू, 3363 जखमी

>> 2017 मध्ये एकूण 3014 प्रवाशांचा मृत्यू, 3345 जखमी

>> 2018 मध्ये एकूण 2981 प्रवाशांचा मृत्यू, 3349 जखमी

>> 2019 मध्ये एकूण 2664 प्रवाशांचा मृत्यू, 3158 जखमी

Passengers Death On Railway Track

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते, मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंत बांधण्याचा आदेश दिला आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाने यावर लक्ष दिले नाही. परंतु, रेल्वे प्रशासन यावर दुर्लक्ष करत आहे. अजून किती प्रवाशांच्या जीव गेल्यावर रेल्वे प्रशासन लक्ष देणार, असा प्रश्न शकील अहमद शेख यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्ड चेयरमॅन यांना विचारला आहे.

Passengers Death On Railway Track

संबंधित बातम्या :

….तर आम्ही आताही लोकल सुरु करू, मुंबईच्या पालकमंत्र्यांचं मोठं विधान

नाईट कर्फ्यू आणि लोकलबाबत मुख्यमंत्री लक्ष ठेवून, नव्या कोरोनामुळे कडक नियम : राजेश टोपे

मुंबईत लोकल ट्रेनचा नवा फॉर्म्युला; सर्वांना प्रवास करण्यासाठीचं नियोजन लवकरच जाहीर

Mumbai Local Train Update : नव्या वर्षात मुंबई लोकल धावणार का? आरोग्य मंत्री म्हणतात…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.