Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खतरों के खिलाडी, लोकल पाण्यात अडकल्या, NDRF कडून प्रवाशांची थरारक सुटका

सीएसएमटीहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील 251, तर टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधील 39 प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं

खतरों के खिलाडी, लोकल पाण्यात अडकल्या, NDRF कडून प्रवाशांची थरारक सुटका
Follow us
| Updated on: Aug 06, 2020 | 8:28 AM

मुंबई : मुंबईतील मस्जिद बंदर स्थानकाजवळ अडकलेल्या दोन लोकलमधून प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. रेस्क्यू बोटच्या सहाय्याने लोकलमध्ये अडकलेल्या 290 प्रवाशांना काल (बुधवार 5 ऑगस्ट) रात्री बाहेर काढण्यात आले. तुफान पावसामुळे रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यात लोकल अडकल्या होत्या. (Mumbai Local Passengers rescue from stranded trains)

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसाचा फटका मुंबई लोकललाही बसला. मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर स्टेशनपासून काही अंतरावर दोन लोकल अडकल्या होत्या. रुळांवर चार ते पाच फूट पाणी भरल्यामुळे लोकल जागीच थांबल्या होत्या.

मस्जिद बंदर आणि भायखळ्यादरम्यान दोन रेल्वे लोकल अडकून पडल्या. लोकलमध्ये असलेल्या शेकडो प्रवाशांचे प्राण वरखाली होत होते. अखेर अडकून पडलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या टीममधील 45 जण तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

सीएसएमटीहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील 251, तर टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधील 39 प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. सुटका केलेल्या प्रवाशांची तात्पुरती राहण्याची सोय मुंबई महापालिकेने जवळच्या शाळांमध्ये केली होती.

मुंबई-ठाणे रेड अलर्ट

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टीसह उत्तर कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. किनारपट्टी भागात ताशी 70 किमी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

“मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, सावधानता बाळगा” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील पावसाचा आढावा घेत पालकमंत्र्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एनडीआरएफची प्रत्येकी एक टीम तैनात असून संपूर्ण राज्यात 15 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबईत अनेक वृक्ष उन्मळले

मुंबईत कालच्या दिवसात घरं पडण्याच्या सहा तक्रारी आल्या, तर झाडं आणि फांदी पडल्याच्या 141 घटना घडल्या. तुफान पावसाने मुंबईची अक्षरशः पुरेवाट झाली. गेल्या दोन दिवसापासून सलग पाऊस कोसळत आहे. (Mumbai Local Passengers rescue from stranded trains)

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.